ETV Bharat / city

'अधिक कठोर नियम लावण्याचे मत व्यक्त करणे ही केवळ लुडबुड' - central team for corona

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केवळ दोन दिवसांचा लॉकडाउन जाहीर करून तितकासा फरक पडणार नसून अधिक कठोर नियम लावण्यात यावे, असे मत केंद्रीय पथकाने व्यक्त केले असल्याचे वृत्त आहे. यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे.

काँग्रेस नेते भाई जगताप
author img

By

Published : Apr 6, 2021, 5:29 PM IST

Updated : Apr 6, 2021, 10:30 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना या स्थितीचा मदत करण्याऐवजी केंद्राकडून याचे राजकारण होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने केवळ बिगर भाजपाशासित राज्यांचीच का निवड केली, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केवळ दोन दिवसांचा लॉकडाउन जाहीर करून तितकासा फरक पडणार नसून अधिक कठोर नियम लावण्यात यावे, असे मत केंद्रीय पथकाने व्यक्त केले असल्याचे वृत्त आहे. यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा - कोल्हापुरात विनामास्क फिरणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

'...तर जनतेचा रोष अधिक वाढण्याची शक्यता'

महाराष्ट्र सरकारने कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" मोहिमेतर्गत कठोर निर्बंध लावले आहेत. तसेच शनिवार आणि रविवारी राज्यात कडक लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या उपाययोजनांमुळे तितकासा फरक पडणार नसून अधिक कठोर निर्बंध लावण्याचे मत केंद्राच्या पथकाने व्यक्त केले आहे. एकीकडे राज्यात लॉकडाउनला जनतेचा तीव्र विरोध होत आहे. जमावबंदीअंतर्गत दिवसा जीवनोपयोगी वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला ही व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध होताना दिसत आहे. या स्तिथीत अधिक कठोर निर्णय घेतल्यास जनतेचा रोष अधिक वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे केंद्रीय पथकाने अधिक कठोर नियम लावण्याचे मत व्यक्त करणे ही केवळ लुडबुड असल्याची टीकाही त्यांनी केली. केंद्राचे पथक बिगर भाजपाशासित पंजाब, छत्तीसगढ आणि पंजाबमध्येच का पाहणी करत आहे, इतर राज्यांत कोरोना नाही का, असेही त्यांनी म्हटले.

राज्यात कोरोनाचे थैमान

सध्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून देशाच्या एकूण रुग्ण संख्येच्या ५५ टक्के रुग्ण संख्या ही महाराष्ट्रात आढळून येत आहे. राज्यात दररोज ५० हजाराच्या घरात रुग्ण संख्या वाढते आहे. तर मुंबईने गेल्या आठवड्यात ११ हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला असून सलग तीन दिवस नऊ हजार रुग्णांचा आकडा कायम आहे. या स्तिथीत राज्य सरकारने सोमवार ५ एप्रिलपासून कठोर निर्बंध लावले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व घटकांना हे नियम लागू करण्यात आले आहेत. राज्यातील धार्मिक स्थळे ही ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांना राज्यात विरोधाचा सूर उमटत आहे. यातच केंद्राने अधिक कठोर निर्बंध लागू करण्याचे मत व्यक्त केल्याने राज्य सरकारच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.

हेही वाचा - कोरोनाचा कहर : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आजपासून भाविकांसाठी बंद

लॉकडाउनसंदर्भात केंद्राच्या सूचना

गेल्या महिन्यात १५ मार्च रोजी महाराष्ट्रात १६ हजार ६२० नव्या रुग्णांची वाढ झालेली असतानाच केंद्राने राज्याला अधिक कठोर निर्बंधांच्या सूचना दिल्या होत्या. केवळ लॉकडाउनच नाही तर बाधित क्षेत्र निश्चित करून (कंटेनमेंट झोन) त्या ठिकाणी अटकाव करण्याच्या सूचना करणारे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना लिहिले होते. मात्र लॉकडाउन संदर्भात त्यानंतर केंद्राशी कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

Last Updated : Apr 6, 2021, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.