ETV Bharat / city

Congress confuse in BMC election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर अजूनही संभ्रम! - Congress confuse in BMC election

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे घोडामैदान जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी ( Political parties preparation for BMC election ) सुरू केली आहे. भाजपने यंदा कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर सत्ता काबीज करण्याच ठरविलेले आहे. यासाठी भाजप नेते, माजी मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांच्याकडे ( BMC election responsibility to Ashish Shelar ) पूर्ण जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. तर

महापालिका निवडणूक
महापालिका निवडणूक
author img

By

Published : Feb 8, 2022, 9:33 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ( Mumbai corporation election ) तोंडावर येऊन ठेपलेली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. असे असले तरीसुद्धा काँग्रेस अजून संभ्रमात आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ( Mumbai congress on BMC election ) ही निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचा यापूर्वीच नारा दिला आहे. याबाबत अजूनही मतमतांतरे दिसून येतात.

भाजपही पूर्ण तयारीनिशी मैदानात-
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे घोडामैदान जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी ( Political parties preparation for BMC election ) सुरू केली आहे. भाजपने यंदा कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर सत्ता काबीज करण्याच ठरविलेले आहे. यासाठी भाजप नेते, माजी मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांच्याकडे ( BMC election responisbility to Ashish Shelar ) पूर्ण जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही या निवडणुकीसाठी पूर्ण तयारीला लागली आहे. मागील ( congress meeting over BMC election ) आठवड्यात महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, नेते बाबा सिद्दिकी, मंत्री असलम शेख, मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, विरोधी पक्ष नेते रवी राजा, माजी खासदार मिलिंद देवरा, आमदार अमिन पटेल, झिशान सिद्दीकी हे सर्व नेते, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

Congress confuse in BMC election :

हेही वाचा-Yashomati Thakur On Modi : नेहरुंना प्रतिमा उंचावण्यासाठी नौटंकी चाळे करावे लागले नाहीत - ॲड. यशोमती ठाकूर

Confusion over Congress self-reliance in Mumbai Municipal Corporation elections!

युती व स्वबळावर लढण्यासाठी मतमतांतरे
काही नगरसेवकांनी युती तर काही नगरसेवकांनी स्वतंत्र लढायला हवे, असे मत नोंदविली आहेत. या कारणाने महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील या हे स्वतः संभ्रम अवस्थेत आहेत. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काँग्रेसही सत्तेत आहे. जर महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र लढली तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेबरोबर भाजपशीही मुकाबला करावा लागणार आहे. अशात मते मोठ्या प्रमाणामध्ये फुटण्याची भीती काही नगरसेवकांनी व्यक्त केली. शिवसेना आणि भाजप पूर्वी एकत्रित लढत असताना विरोधी मते काँग्रेसला मिळत होती. 2017 मध्ये हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले या लढाईत काँग्रेस मागे पडली. काँग्रेसला मिळणारी मते काही शिवसेनेला तर काही भाजपला मिळाल्याचा दावासुद्धा काही नगरसेवकांनी केला.

हेही वाचा-Nana Patole Criticized Narendra Modi : 'शरम करो मोदी'! पंतप्रधानांच्या निषेधार्थ राज्यभरात कॉंग्रेस उद्यापासून रस्त्यावर उतरणार : नाना पटोले

अखेर निर्णय हायकमांडच्या हाती
भाजप महापालिकेचा विरोधी पक्षनेता म्हणून मजबूत आहे. भाजप वारंवार सेनेचे भ्रष्टाचार उजेडात आणत आहेत, अशा परिस्थितीत सेनेबरोबर युती केली तर आपणही त्या भ्रष्टाचाराचे सहभागी आहोत असा संदेश जनतेमध्ये जाऊ शकतो, अशी भीती काही नगरसेवकांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे आपण राज्यात सत्तेमध्ये सहभागी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या सोबत जर एकत्र लढलो तर काही प्रमाणामध्ये त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. नगरसेवकांची संख्या तरी वाढू शकते, असा विश्वास काही नगरसेवकांनी व्यक्त केला. एकंदरीत आता या बैठकीच्या व मतमतांतरांच्या चर्चेनंतर हा अहवाल हायकमांडला देण्यात येणार आहे. त्यानंतर हायकमांड जो निर्णय घेतील तो अंतिम असेल अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा-Bully Buy App Case: बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपी श्‍वेता सिंगच्या जामीनावर बुधवारी सुनावणी

३ निवडणुकीपासून काँग्रेसचा आलेख उतरता
काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ( Congress corporators in BMC ) वर्षानुवर्षे घसरत चालली आहे. २००७ ला ७५ नगरसेवक असलेली काँग्रेस २०१२ च्या निवडणुकीत ५१ नगरसेवकांवर आली आहे. तर मागच्या २०१७ च्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या ३१ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांचा काँग्रेसचा उतरता आलेख वरती नेण्याची मुख्य जबाबदारी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी घेतली आहे. त्यामुळे स्वबळाचा निर्णय सहज होणार नाही हे निश्चित.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.