ETV Bharat / city

Congress BJP Workers Agitation Mumbai : पेगाससच्या मुद्द्यावरून काँग्रेस - भाजप कार्यकर्ते आमनेसामने; परिसरात तवाणपूर्ण शांतता - मुंबईत काँग्रेस भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन

पेगाससच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने ( Congress-BJP Workers Agitation Mumbai ) आले आहेत. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे भाजप कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. दादरच्या रेल्वे स्थानकाबाहेर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Congress BJP Workers Agitation Mumbai
पेगाससच्या मुद्द्यावरून काँग्रेस - भाजप कार्यकर्ते आमनेसामने
author img

By

Published : Feb 2, 2022, 1:06 PM IST

Updated : Feb 2, 2022, 7:55 PM IST

मुंबई - पेगाससच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने ( Congress-BJP Workers Agitation Mumbai ) आले आहेत. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे भाजप कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. दादरच्या रेल्वे स्थानकाबाहेर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

कार्यकर्त्यांचे आंदोलन

भाजप कॉंग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची -

मुंबई काँग्रेसतर्फे आज (बुधवार) भाजप मुंबई कार्यालयावर पेगासस प्रकरणावरून आंदोलन छेडण्यात येणार होते. मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशन सिद्दीकी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले. या दरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. भाजपविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये बाचाबाची दिसून आली. विशेष करून भाजपच्या महिला कार्यकर्त्या फार आक्रमक दिसून आल्याने पोलिसांनी यानंतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Congress BJP Workers Agitation Mumbai
परिसरात तवाणपूर्ण शांतता -

परिसरात तवाणपूर्ण शांतता -

काँग्रेस आणि भाजपच्या आंदोलनातील राड्यानंतर दादर पूर्व परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून याठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. अद्यापही पोलिसांनी वाहतूक सुरू केलेली नाही.

Congress BJP Workers Agitation Mumbai
परिसराला छावणीचे स्वरूप

परिसराला छावणीचे स्वरूप -

युवक काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आंदोलनादरम्यान जोरदार शाब्दिक चकमक आणि घोषणाबाजी झाली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरा समोर आल्यानंतर गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखून दोन्ही कार्यकर्त्यांना काही अंतरावर दूर ठेवण्यात यश मिळवले. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अचानक समोरासमोर आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. अखेरीस मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून दादर पूर्व येथील दादर रेल्वे स्थानक ते डीएसपी रोड मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली असून याठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा वसंत स्मृती कार्यालयाबाहेर लावण्यात आला असून दादर रेल्वेस्थानक परिसर आला यामुळे पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

हेही वाचा - Nitesh Rane Arrested : नितेश राणे यांना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी

Last Updated : Feb 2, 2022, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.