मुंबई - वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार नाही, अशी चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, वरळीमध्ये आघाडीचा उमेदवार असणारच, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज स्पष्ट केले.
वरळीमध्ये आघाडीचा उमेदवार असणारच, नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, हे स्पष्ट झाल्यानंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे उभे राहणार असून त्याजागी राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार नसल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र, ही राज्यसभा नसून, येथे लोकांमधून उमेदवार निवडला जाणार असल्यामुळे, वरळीमधून आघाडीचा उमेदवार नक्कीच उभा राहणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.हेही वाचा : 'भाजपमध्ये सगळे गँगवॉरचे लोक एकत्र येतायत'
आघाडीमध्ये 'मनसे' नाहीच..
मनसेशी आघाडीमध्ये येण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे देखील यावेळी नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या वेळी मनसेने शिवसेना-भाजप विरोधात प्रचार केला होता. मात्र, तेव्हाही याबाबत काही बोलणी नव्हती झाली, आणि आताही तशी बोलणी झाली नसल्याचे मलिक यांनी सांगितले.
आघाडीमध्ये 'मनसे' नाहीच.. जागावाटपासंदर्भात खुलासा नाही..आघाडीमधील जागावाटपाबाबत खुलासा करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. मात्र, काही लहान पक्षांशी अजूनही चर्चा सुरु असल्याने याबाबत खुलासा होऊ शकला नाही. याबद्दल दिलगिरी व्यक्त करत, हा खुलासा प्रेस नोटच्या माध्यमातून करण्यात येईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.हेही वाचा : गांधी@१५० : पंतप्रधान मोदी यांनी केली 'ईटीव्ही भारत'च्या गाण्याची प्रशंसा...