ETV Bharat / city

Union Budget 2022 : सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प - विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Union Minister Nirmala Sitharaman ) यांनी संसदेत अर्थसंकल्प ( Union Budget 2022 ) सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राज्याचे विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यावर ( Pravin Darekar On Union Budget 2022 ) प्रतिक्रिया दिली आहे.

प्रविण दरेकर
प्रविण दरेकर
author img

By

Published : Feb 1, 2022, 9:50 PM IST

मुंबई - या अर्थसंकल्पात पायाभूत मूलभूत सुविधांच्या विकासासाठी मोठी तरतूद करण्यात आल्यामुळे देशातील पायाभूत सुविधेला चालना मिळणार आहे. यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्था बळकट करण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी ( Pravin Darekar On Union Budget 2022 ) दिली.

सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प!

केंद्रीय अर्थसंकल्पात ( Union Budget 2022 ) सर्व घटकांचा सर्वव्यापी विचार करत प्रत्येक घटकांना यामध्ये अंतर्भाव करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांच्या ( Union Minister Nirmala Sitharaman ) कार्यप्रणालीनुसार सर्वसामान्यांना दिलासा देणारा असा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प सर्वस्पर्शी व सर्वव्यापी आहे. देशाच्या विकासाला गती मिळणार आहे, कारण गतिमानतेला यामध्ये स्थान दिलेले आहे. समाजातील सर्व घटकांसोबत शिक्षण क्षेत्राला महत्त्व देण्यात आले आहे.

देशाच्या आर्थिक व्यवस्था बळकट करण्याच्या प्रयत्न

युवकांच्या हाताला काम मिळेल याचा सकरात्मक विचार करण्यात आला आहे. सूक्ष्म लघु उद्योगाच्या माध्यमातून २ लाख कोटी रुपये प्रस्तावित करत बेरोजगारांच्या हाताला काम देत उद्योग व स्वयंरोजगार क्षेत्रला बळकटी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सहकारी संस्थांसाठीच्या कररचनेमध्ये दिलासा देण्यात येऊन सहकार क्षेत्रात देशामध्ये आता सकारात्मक उभारणी करण्याचा मानस अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. पायाभूत मूलभूत सुविधांच्या विकासासाठी मोठी तरतूद करण्यात आल्यामुळे देशातील पायाभूत सुविधेला चालना मिळणार आहे. यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्था बळकट करण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.