ETV Bharat / city

ब्रिटिशकालीन हँकॉक पूल पुनर्बांधणीसाठी दुसरा गर्डर बसवण्याचे काम पूर्ण - ब्रिटिशकालीन हँकॉक पूल

मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील माझगाव व डोंगरी यांना जोडणाऱ्या ब्रिटीशकालीन हॅकॉक पूल धोकादायक झाल्याने पाडण्यात आला आहे. या पुलाच्या पुनर्बाधणीतील महत्वाचा टप्पा असलेला दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पूर्ण करण्यात आले.

Hancock Bridge reconstruction
Hancock Bridge reconstruction
author img

By

Published : Jun 7, 2021, 10:28 PM IST

मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील माझगाव व डोंगरी यांना जोडणाऱ्या ब्रिटीशकालीन हॅकॉक पूल धोकादायक झाल्याने पाडण्यात आला आहे. या पुलाच्या पुनर्बाधणीतील महत्वाचा टप्पा असलेला दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ६ जून रोजी पूर्ण करण्यात आले. हा आव्हानात्मक आणि महत्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने या पुलाच्या पुनर्बाधणीला आणखी वेग येणार असल्याची माहिती पालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

दुसरा गर्डरही बसवला -

माझगाव आणि डोंगरी यांना जोडणारा हॅकॉक पूल सन २०१६ मध्ये मध्य रेल्वेने तोडला. या पुलाच्या पुनबांधणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. हॅकॉक पुलाच्या बांधणीतील पहिल्या टप्प्यात पहिला गर्डर जुलै २०२० मध्ये बसवण्यात आला आणि त्यावरील पदपथ जानेवारी २०२१ मध्ये सर्वसामान्यांच्या वापरासाठी खुला करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातील सुमारे ६७५ मेट्रिक टन वजनाचा गर्डर स्थापन करण्याचे काम काल पूर्ण करण्यात आले. महानगरपालिका आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून हे आव्हानात्मक काम पूर्ण केले. दुसरा गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाल्याने पुलाची पुनर्बाधणी आणखी जलद गतीने करता येणार आहे. या पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम उपलब्ध रस्त्याची रुंदी तसेच आवश्यक संदीकरण तसेच बाधितांचे पुनर्वसन लवकरच केले जाणार आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाने उप आयुक्त (पायाभूत सुविधा) तथा प्रमुख अभियंता (रस्ते व पूल) राजेंद्रकुमार तळकर आणि त्यांचे सहकारी अधिकारी हे या पुलाच्या पुनर्बांधणीची कार्यवाही करीत आहेत.

हँकॉक पूल -

सँडहर्स्टरोड, कर्नाक बंदर जवळचा ब्रिटीश कालीन हँकॉक पूल धोकादायक झाल्याने हा पूल पाडून नवीन पूल उभारला जात आहे. या पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. हँकॉक पूल हा १३५ वर्षे जुना व त्यावरील सततच्या रहदारीमुळे हा पूल असुरक्षित असल्याचे रेल्वे व पालिका प्रशासनाने जाहीर केले होते. या पुलाच्या पुनर्बांधणी करण्यासाठी या पुलाचे पाडकाम जानेवारी २०१६ साली करण्यात आले. मात्र त्याजागी पर्यायी नवीन पूल उभारण्याबाबत योग्य नियोजन न झाल्याने या पुलाचे काम रखडले होते. यातच या पुलाच्या कंत्राटकामाचा वादही समोर आला. पुढे या पुलाचे प्रकरण न्यायालयात गेले. पूल पाडल्यानंतर पर्यायी व्यवस्था न केल्याने या पुलाचा वापर करणाऱ्या नागरिकांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला होता. २०१८ मध्ये हे काम देण्यात आले. १९ महिन्यात काम पूर्ण करणे अपेक्षित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.