ETV Bharat / city

Sandeep Pathak awarded विनोदी अभिनेता संदीप पाठकला राख मधील भावनिक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

विनोदी अभिनेता संदीप पाठकला Comedian Sandeep Pathak राख मधील भावनिक भूमिकेसाठी emotional role in Rakh सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार won the Best Actor Award मिळाला आहे. कुठल्याही कलाकारासाठी पुरस्कार खूप मोलाचा असतो. त्यातही जेव्हा कलाकार वेगळी वाट चोखाळतो आणि त्यावर पुरस्काराची मोहोर उमटली तर तो दुग्धशर्करा योग असतो.

Sandeep Pathak
संदीप पाठक
author img

By

Published : Aug 31, 2022, 1:51 PM IST

मुंबई अलीकडच्या अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून राख चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते संदीप पाठक Comedian Sandeep Pathak यांना गौरविण्यात आले आहे. आता जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही संदीप पाठक यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावत आपल्या यशाची मालिका सुरुच ठेवली आहे. १५ देशांचे ५४ चित्रपट या जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडण्यात आले होते.

आपण केलेल्या कष्टाला जेव्हा कौतुकाची थाप मिळते, तो क्षण भाग्याचा असतो. हा पुरस्कार मला मिळाला असला तरी आमच्या संपूर्ण टीमचे हे श्रेय आहे. एक वेगळी कलाकृती सादर करण्याचा आमच्या टीमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून विविध महोत्सवांमध्ये घेतली जाणारी राख चित्रपटाची दखल आम्हाला सुखावणारी असल्याचे संदीप पाठक सांगतात. राख चे दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा ETV बाल भारतला प्रतिष्ठेचा ANN पुरस्कार, अनेक कार्यक्रमांचे झाले विशेष कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.