ETV Bharat / city

मुंबईतील महाविद्यालये उद्यापासून सुरू होणार नाहीत, मुंबई विद्यापीठाची माहिती

राज्यातील महाविद्यालये उद्या म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी सुरू होणार होती, मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये उद्या सुरू होणार नाहीत. महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 22 फेब्रुवारीपर्यंत विचार होणार आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 14, 2021, 1:29 PM IST

Updated : Feb 14, 2021, 2:49 PM IST

मुंबई - मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये उद्यापासून (सोमवार) सुरू होणार नाहीत, असे मुंबई विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 22 फेब्रुवारीपर्यंत फेरविचार होणार आहे. त्यानंतरच महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय होणार आहे.

मुंबई विद्यापीठाला महापालिका आयुक्तांचे पत्र -

मुंबई विद्यापीठाला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी एक पत्र लिहून सांगितले आहे की, उद्यापासून (सोमवार) मुंबईमधील महाविद्यालये सुरू करू नका. 22 फेब्रुवारीपर्यंत आम्ही कोरोनाचा आढावा घेऊन माहिती देऊ त्यानंतरच मुंबई विद्यापीठाने आपली महाविद्यालये सुरू करावीत अशी विनंती पालिका आयुक्तांनी पत्राद्वारे केली आहे.

15 फेब्रुवारीपासून सुरू होणार होती महाविद्यालये -

मुंबई विद्यापीठाचे पत्रक
मुंबई विद्यापीठाचे पत्रक

राज्यातील महाविद्यालये उद्या म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी सुरु होणार होती, मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये उद्या सुरू होणार नाहीत. महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 22 फेब्रुवारीपर्यंत विचार होणार आहे. एकीकडे राज्यभरातील विद्यापीठे त्याअंतर्गत येणारी महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्याबाबत राज्य सरकारने 3 फेब्रुवारी रोजी निर्णय घेतला. तरीसुद्धा मुंबईतील महाविद्यालये उद्यापासून सुरू होणार नाहीत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी दिली आहे.

विद्यापीठ महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय जरी राज्य सरकारने दिला असला तरी स्थानिक प्रशासन यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय देणार आहे, असे शासन निर्णयात नमूद आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाला मुंबई महापालिका आयुक्तांनी पत्र पाठवून 22 फेब्रुवारीपर्यंत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊन सूचना देऊ आणि त्यानंतर मुंबईतील महाविद्यालये कधी सुरू करता येतील यावर निर्णय घेऊ असे सांगण्यात आले आहे.

Last Updated : Feb 14, 2021, 2:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.