ETV Bharat / city

CNG- PNG Price Hike: महागाईचा भडका! सीएनजी 6 तर पीएनजीच्या दरात 4 रुपयांची पुन्हा वाढ

author img

By

Published : Aug 3, 2022, 10:16 AM IST

CNG- PNG Price Hike : सर्वसामान्य जनतेच्या खिशाला पुन्हा झळ लागणार आहे. सर्व प्रवासी वाहतुकीचे भाडे वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे जनता यामध्ये होरपळणार आहे. सीएनजीच्या दरात 6 रुपयांची भर पडली आहे, तर पीएनजीचे दर हे 4 रुपयांनी वाढलेले आहे.

CNG- PNG Price Hike
CNG- PNG Price Hike

मुंबई - मुंबई आणि राज्यात सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला पुन्हा झळ लागणार आहे. सर्व प्रवासी वाहतुकीचे भाडे वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे जनता यामध्ये होरपळणार आहे. सीएनजीच्या दरात 6 रुपयांची भर पडली आहे, तर पीएनजीचे दर हे 4 रुपयांनी वाढलेले आहे. आणि ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू केली जाणार आहे.

सीएनजी 6 तर पीएनजी 4 रुपयांनी दरवाढ - देशातील आणि महाराष्ट्रातील विशेष करून मुंबई सारख्या शहरातील सर्वसामान्य श्रमिक जनता नोकरदार जनता आधीच प्रचंड महागाईने घराचे खर्च कसं चालवावा या विवांचनेमध्ये आहे. त्यातून सुटका होत नाही, तोपर्यंत महागाईचे एक- एक धक्के हे सरकार जनतेला देत आहे. मुंबई महानगर गॅस लिमिटेड यांनी सीएनजी आणि पीएनजी यांचे दर वाढवलेले आहेत. सीएनजीच्या दरामध्ये तब्बल 6 रुपयांची वाढ तर पीएनजीचे दर हे 4 रुपयांनी वाढविले गेले आहे. हा निर्णय 3 ऑगस्ट पासून मध्यरात्री लागू केला जाणार आहे.

दर वाढले - महानगर गॅस लिमिटेड ने नुकत्याच प्रसिद्धी केलेल्या नव्या दर पत्रकानुसार आता राज्यातील ग्राहकांना सीएनजीसाठी प्रति किलोमागे 86 रुपये असा दर मोजावा लागणार आहे. पीएनजीच्यासाठी प्रति किलो 52 रुपये आणि 50 पैसे इतके रुपये मोजावे लागणार आहेत. देशांमध्ये गॅसच्या वाढलेला किंमतीचा परिणाम म्हणून एमजीएच्या उत्पादनाच्या किंमतीवर होतो. त्याचाच एक परिणाम म्हणून सीएनजीचे दर आणि पीएनजीचे दर वाढले, असल्याचे महानगर गॅस लिमिटेडने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. महानगर गॅस लिमिटेड यांच्याकडून सीएनजी आणि पीएनजीच्या गॅसचा पुरवठा मुंबईभर केला जातो.

सीएनजीच्या दराच्या संदर्भात 29 एप्रिल 2022 रोजी सीएनजीमध्ये 4 रुपयांची दरवाढ झाली होती. आणि आता पुन्हा त्यात भर पडलेली आहे. तसेच याआधी मुंबईमध्ये सीएनजीचे दर 12 जुलै 2022 रोजी वाढवले गेले होते.

हेही वाचा - उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुखासह पाच जणांना अटक, मुंबईमधून बबन थोरातांना अटक

हेही वाचा - MLA Praniti Shinde : राज्यातील जनतेचं 'नॉट ओके'; शहाजीबापू पाटील यांच्यावर नाव न घेता, प्रणिती शिंदेंची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.