ETV Bharat / city

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर होणार शस्त्रक्रिया? - उद्धव ठाकरे शस्त्रक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरू झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याची माहिती समोर आली.

f
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Nov 9, 2021, 7:29 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरू झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याची माहिती समोर आली. त्यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांवर येत्या दोन ते तीन दिवसांत महत्वाची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळते. गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात ही शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. डॉ. शेखर भोजराज हे मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर; शिवसेना रामदास कदमांचे तिकीट कापणार?

  • येत्या दोन ते तीन दिवसात होणार शस्त्रक्रिया?

उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या देखील केल्या होत्या. हा त्रास बळावल्याने त्यांच्यावर येत्या दोन ते तीन दिवसात एक शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा - Fadnavis Vs Malik : देवेंद्र फडणवीस-नवाब मलिकांमध्ये 'वाकयुद्ध'; पाहा कोण काय म्हणाले?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.