मुंबई- प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर रोजी पाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमात अथवा शासकीय बैठकांना प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी अनेक बैठका आणि कार्यक्रमांना ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. त्यांच्या या अनुपस्थितीबाबत भाजपने सातत्यानं टीकेची झोड उठवली. मात्र भाजपच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देत मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसांपासून आपला कार्यक्रमांमधील आणि बैठकांमध्ये सहभाग वाढवला आहे. त्याच अनुषंगाने २६ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमासाठी महानगरपालिकेची तयारी
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबई महानगर पालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. कार्यक्रम परिसरात स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीसाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला ही विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी कोण राहणार उपस्थित
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री, मंत्रीगण, वरिष्ठ सनदी अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमासाठी सुमारे तीनशे सत्तर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे यात एक सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्यासह 17 पोलीस निरीक्षक 27 सहाय्यक पोलीस निरीक्षक पाच महिला पोलीस निरीक्षक 50 महिला पोलिसांसह 275 पोलिस जवानांचा समावेश असणार आहे.
Mumbai Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री राहणार उपस्थित - Maharashtra Republic Day 2022
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला आणि संचलनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुमारे अडीच महिन्यानंतर ते सार्वजनिक कार्यक्रमाला ते प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.