ETV Bharat / city

Uddhav Thackeray replied to Eknath Shinde : भाजपसोबत असताना कमी त्रास झाला का? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेना फ्लॅशबॅक - बंडखोर नेते एकनाथ शिंदे

मागील पाच वर्षात भाजपने कमी त्रास दिला का? अशी आठवण मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी करून दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत आहे. तुम्ही घाबरू नका असा विश्वास ही ठाकरे यांनी शिंदे यांना दिल्याची माहिती मिळत आहे.

Uddhav Thackeray replied to Eknath Shinde

author img

By

Published : Jun 21, 2022, 10:57 PM IST

मुंबई: भाजप सोबत जुळवून घेण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या एकनाथ शिंदे यांना, मागील पाच वर्षात भाजपने कमी त्रास दिला का? अशी आठवण मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांनी करून ( Uddhav Thackeray replied Eknath Shinde praposal ) दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत आहे. तुम्ही घाबरू नका असा विश्वास ही ठाकरे यांनी शिंदे यांना दिल्याची माहिती मिळत आहे.

महाविकास आघाडी ताळमेळ नसल्याचे आमदार आणि मंत्र्यांची भूमिका आहे. पक्षाची विचारधारा हिंदुत्वाची नसल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊ नका. उलट भाजपसोबत युती करावी, असे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel leader Eknath Shinde ) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे म्हणणे मांडले. यावर ठाकरे यांनी शिंदे यांना समजावण्याचा प्रयत्न करताना भाजपसोबत असताना मिळालेल्या वागणुकीचे स्मरण करून दिले.

महाविकास आघाडी सोबत, घाबरू नका -

माझं काही नाही, तुमचं काही नाही मग भाजपसोबत जायचं कशाला? पंचवीस वर्षे आपण युतीत होतो. मात्र सत्तेत आल्यानंतर भाजपने जो त्रास दिला, तो कमी होता का? मग भाजपसोबत कशाला जायचं, असे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे याना सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा ( Uddhav Thackeray and Eknath Shinde discussion ) झाली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपल्या सोबत आहेत. त्यामुळे घाबरू नका, अशा शब्दात धीर दिल्याचे समजते. तसेच एकनाथ शिंदे सोबत चर्चा झाली असून ते माझं ऐकतील, असा विश्वास व्यक्त करताना लवकरच सर्वजण आपल्यासोबत असतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली.

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : भाजपाची सत्ता आणि मला उपमुख्यमंत्री पद तरच... - एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.