ETV Bharat / city

लोकांनी गर्दी कमी न केल्यास, प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील - मुख्यमंत्री - कोरोना विषाणू बद्दल बातमी

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात संचारबंदी असताना काही लोक नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे दिसत आहे. लोकांनी गर्दी कमी न केल्यास प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

cm
लोकांनी गर्दी कमी न केल्यास , प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील - मुख्यमंत्री
author img

By

Published : Mar 31, 2020, 8:38 PM IST

Updated : Mar 31, 2020, 8:45 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात संचारबंदी असताना काही लोक नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे निदर्शनाला आले आहे. गर्दी कमी न केल्यास प्रसंगी कोठोर निर्णय घ्यावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईतील स्थितीचा आज आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले की, आपण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून 24 तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, औषधांची दुकाने सुरू ठेवली. मात्र, याचा गैरफायदा घेऊन लोक फिरायला निघाल्यासारखे निघत असतीलल तर, ही सोय बंद करण्याचा कठोर निर्णय प्रसंगी घ्यावा लागेल.

मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण कोळीवाडाचा परिसर दूषित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तेथील नागरिकांच्या हालचालीवर निर्बंध आले आहेत. या घटनेनंतर अशाच प्रकारे मुंबईत साथ फैलावून आणखी दूषित क्षेत्र निर्माण झाल्यास आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाला हा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. मुंबई हे देशातील एक प्रमुख शहर असून आर्थिक राजधानी आहे. कसेही करून येथील परिस्थिती नियंत्रणात राहिली पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, तातडीने भरारी पथके सक्रीय करून तपासणीस सुरुवात झाली पाहिजे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेतल्या वॉर्डमधील खासगी डॉक्टर्सना शोधून त्यांना त्यांचे दवाखाने सुरू करण्याची विनंती करा, असे निर्देश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांना आवश्यक ते मास्क वगैरे द्या, पण नियमित रुग्ण तपासण्यास सुरुवात झाली तर शासकीय आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल, असे त्यांनी सांगितले. अजूनही काही बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी दिसते. तेथील भाजीबाजारांमध्ये शिस्त आणा, त्यांना गल्ल्या किंवा तारखा वाटून द्या. प्रसंगी बाजार मोकळ्या जागांवर स्थलांतरित करा, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

सोसायट्यांनी फवारणी करू नये -

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई तसेच राज्यातील इतर शहरांतील अनेक सोसायट्या व वस्त्या तसेच कॉलनीमध्ये जंतूनाशकांची फवारणी करणे सुरू आहे. परंतु या जंतूनाशकांच्या बेसुमार आणि अवाजवी फवारणीमुळे अपाय होऊ शकतो, त्यामुळे अशी फवारणी करू नये आणि करायची असल्यास संबंधित महानगरपालिकेमार्फत प्रत्यक्ष त्या भागाची तपासणी करून घ्यावी आणि आवश्यकता भासल्यास मनपा फवारणी करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जलद प्रतिसाद द्या -

मुंबई पालिकेचे कर्मचारी कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जातात, अनेक गंभीर संकटात त्यांनी काम केले आहे. त्यामुळे आपल्याला अधिक जलदपणे या संकटात काम करायचे आहे. आपले रिपोर्ट्स तातडीने मुख्यालयात येईल, हे पाहिले पाहिजे म्हणजे मुकाबला करण्यासाठी लगेच आवश्यक ते नियोजन करता येईल, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले .

यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी देखील पालिका अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून कोरोनाचा मुकाबला करावा, याविषयी मार्गदर्शन केले.

Last Updated : Mar 31, 2020, 8:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.