ETV Bharat / city

गर्दी करू नका.. त्रिसूत्री पाळा; दुसरी लाट उलटण्याचा धोका, मुख्यमंत्र्यांकडून भीती व्यक्त - मालाड येथील कोविड रुग्णालयाचे उद्घाटन

राज्यात कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट आली. सध्या ही लाट ओसरत आहे. मात्र, नागरिकांनी त्रिसुत्री नियमांचे पालन न केल्यास ही लाट उलटण्याचा धोका अधिक आहे, अशी भिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

covid-hospital-at-malad
covid-hospital-at-malad
author img

By

Published : Jun 28, 2021, 4:14 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट आली. सध्या ही लाट ओसरत आहे. मात्र, नागरिकांनी त्रिसुत्री नियमांचे पालन न केल्यास ही लाट उलटण्याचा धोका अधिक आहे, अशी भिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मालाड येथील कोविड रुग्णालयाचे अनावरण मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

मालाड रुग्णालयात अद्यावत सेवा सुविधा -

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. म्युकर मायकोसिस, डेल्टा आणि आता डेल्टा पल्स असे प्रकार बदलत आहेत. सुरुवातीच्या काळात ज्याप्रकारे कोरोना पसरला. तसा डेल्टा प्लसने अद्याप रंग दाखवलेला नाही. दुसरी लाट ओसरत आहे. पूर्णपणे अद्याप ओसरलेली नाही. नागरिकांनी गर्दी करु नये, त्रिसूत्री नियमांचे पालन करावे, अन्यथा लाट उलटण्याचा धोका संभावतो, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. एमएमआरडीएने मालाड येथे उभारलेल्या रुग्णालयात अद्यावत सेवा सुविधा असतील. ऑक्सिजन, डायलिसीस सुविधा, लहान मुलांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा येथे उपलब्ध करुन दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. एमएमआरडीए आणि आरोग्य सेवेचा काहीही संबंध नाही. मात्र, सध्याची स्थिती पाहून एमएमआरडीएने घेतलेला निर्णय कौतूकास्पद असल्याचे सांगत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीवर मुख्यमंत्र्यांनी कौतुकाची थाप दिली. तसेच एमएमआरडीने बांधलेले रुग्णालय मुंबई महानगर पालिकेला हस्तांतरित केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

covid-hospital-at-malad
मालाड येथील अत्याधुनिक सुविधांनी युक्त कोविड रुग्णालय
गर्दी करु नका, प्रत्येकाला लस मिळेल -
राज्यात कोरोनाची लाट ओसरत आहे. कोरोना होऊच नये आणि कोविड सेंटर वापराविना पडून राहावेत, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कोविड लसींचा पुरवठा होत असून महाराष्ट्राने विक्रमी लसीकरण केले आहे. येत्या काही दिवसांत 15 लाखांचा टप्पा पार करेल. नागरिकांनी गर्दी करु नये. प्रत्येकाला जशी लस उपलब्ध होईल, त्याप्रमाणे लस दिली जाईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अ‌ॅड. अनिल परब, पर्यटन, पर्यावरण तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.