मुंबई - भारतीय जनता पक्षाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांची फसवणूक केल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. युतीच्या काळात हिंदूत्वाच्या नावाने भाजपाने बाळासाहेबांची फसवणूक केल्याचे ( BJP Cheating With Balasaheb Thackeray ) त्यांनी म्हटले आहे. मात्र, मी भाजपा डावपेचांना बळी पडणार नाही, असेही ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? - हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. त्याचा डंका वाजवण्याची आम्हाला गरज नाही. विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेना हिंदूत्वाच्या आधारे लढवली आणि जिंकली. त्यावेळी भाजपाने विरोधात उमेदवार उभा केला होता. त्यानंतर भाजपाचे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे हिंदूत्वाच्या आधारे युती करण्यासाठी आले होते, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
हिंदुत्त्वाच्या नावावर बाळासाहेबांची फसवणूक - हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपच्या नेत्यांकडून बाळासाहेबांची फसवणूक होताना मी स्वत: पाहिले आहे. मात्र, बाळासाहेबांनी भाजपाच्या खेळीकडे दुर्लक्ष केले. बाळासाहेब भोळे होते, पण मी भोळा नाही. मी भाजपच्या कारस्थानाकडे दुर्लक्ष करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा - MNS Chalo Ayodhya Poster in Mumbai : मनसेचे मुंबईत चला अयोध्या पोस्टर; 5 जूनला जाणार दौऱ्यावर