ETV Bharat / city

कोरोनालसीचा डोस घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला लॉकडाऊनचा इशारा - CM Uddhav Thackeray

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी 1 मार्चला सपत्निक मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

author img

By

Published : Mar 11, 2021, 1:27 PM IST

Updated : Mar 11, 2021, 3:34 PM IST

मुंबई - कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लस घेत आहेत. मुंबईतल्या जे जे हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ डाक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोव्हॅक्सिन लस घेतली. भारत बायोटेकने तयार केलेली ही स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन लस आहे. देशभरात गेल्या 1 मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही कोरोनाची लस घेतली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

या नेत्यांनी घेतली कोरोना लस -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी 1 मार्चला सपत्निक मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली होती. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्येंकैया नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आदिंसह देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली आहे.

कोरोना लसीकरण -

केंद्र शासनाच्या आदेशानुसार 'कोविड-19' लसीकरण 1 मार्चपासून सुरू झाले आहे. या टप्प्यात वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. तसेच, वयाची 45 वर्षे पूर्ण ते 60 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण केले जात आहे.

नोंदणी करण्यासाठी 'ही' कागपत्रे आणावीत सोबत -

ज्यांना लस घ्यायची आहे, त्यांनी लसीकरण केंद्रावर आधारकार्ड घेऊन जायचे आहे. आधारकार्ड नसेल तर जन्मतारीख असणारे ओळखपत्रही नोंदणी ठिकाणी दाखवून नोंदणी करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात राहून गेलेल्या फ्रंटलाइन वर्कर यांना नोकरीचे ओळखपत्र आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत, त्यांनी त्यांच्या रुग्णालयाचे ओळखपत्र दाखवून नोंदणी करवून घ्यायची आहे. प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन नोंदणी करता येईल. सोबतच ‘कोविन’ अथवा ‘आरोग्य सेतू’ या ॲपद्वारेही घरबसल्या ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

Last Updated : Mar 11, 2021, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.