ETV Bharat / city

'प्रगतीचा मार्ग अडवू नका' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आवाहन - CM Uddhav Thackeray latest news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच विरोधकांनी प्रगतीचा मार्ग अडवू नये, असे म्हटलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Dec 20, 2020, 2:26 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. कांजूरमार्गच्या जागेचा वाद केंद्रानं आणि राज्यानं चर्चेतून सोडवला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. होय, माझ्या मुंबईबाबत मी अहंकारी आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी अहंकारी का नसावं?, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे -

  • सावधान राहा हा, थंडीचे आजार सर्दी खोकला ताप सुरू झाले आहे. कोरोना नियम पाळावे लागणार आहेत. लस आल्यानंतरही मास्क बंधनकारक असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
  • युरोप-इंग्लंडमध्ये आजवरचा सर्वात कडक लॉकडाऊन करण्यात आला. युरोपात कोरोनानं रुप बदललंय, कोरोना विषाणूचा संसर्गाचा वेग वाढला, युरोपातील परिस्थितीवरुन शिकलं पाहिजे, परदेशातून येणाऱ्यांच्या टेस्ट थांबवण्यात येणार नाहीत.
  • नवीन वर्ष आणि नाताळच्या काळात काळजी घ्या, लग्नात गर्दी वाढत आहे. अंतर पाळा आणि सावधानता बाळगा.
  • सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. सरकार पडेल यासाठी अनेक जण डोळे लावून बसले होते. पण सरकारने कोरोनाचा धोका, राजकीय आरोप सांभाळत आणि विकास करत एक वर्ष पूर्ण केल आहे.
  • समृद्धी महामार्ग प्रगती पथावर आहे. पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी 1 मे पासून सुरू होणार असून सिंधुदुर्ग एयर पोर्ट सुद्धा लवकर पूर्ण होईल.
  • शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. आर्थिक चणचण राज्याची आहे. केंद्राकडून पैसे धीम्या गतीने येत आहे. मात्र, रडत न बसता सरकार आत्मविश्वासाने पाऊल टाकत आहे. तसेच सरकारने नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे.
  • लॉकडाऊन काळात अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी कोटीचे व्यवहार केले. कराराप्रमाणे 70 % काम मार्गी लावले. तसेच शाळा उघडण्याबाबतीत सावधानतेने निर्णय घेत आहोत. कोस्टल रोडचेही काम वेगाने सुरू आहे.
  • मला विरोधक अहंकारी म्हणतात. हो माझ्या महाराष्ट्रसाठी मी अहंकारी आहे. केवळ एका लाइनसाठी मेट्रोचं कारशेड आरेमध्ये कशाला, हे किती योग्य आहे. आरे शहरातील एकमेव जंगल आहे.
  • कांजूरमार्गच्या जागेचा वाद केंद्रानं आणि राज्यानं चर्चेतून सोडवला पाहिजे. प्रतिष्ठेचा प्रश्न करू नये. आम्ही विरोधकांना श्रेय द्यायला तयार आहोत.
  • विकास घाईघाईने केला जात नाही आणि जर तसे केले गेले. तर त्या प्रकल्पाचे काय होते, त्याच उदाहरण म्हणजे मुंबईतील स्काय वॉक आहे.

हेही वाचा - दिल्ली चलो आंदोलनाचा २५वा दिवस; शेतकरी पाळणार श्रद्धांजली दिवस..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.