ETV Bharat / city

मुख्यमंत्री ठाकरे अ‍ॅक्टिव्ह मोडवर.. कार्यकर्त्यांना म्हणाले हिंदुत्वावर कायम, पक्षबांधणीसाठी योगदान द्या

शिवसेनेच्या आमदारांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( cm uddhav thackeray on hindutva ) यांच्या विरोधात बंड पुकारल्याने सेनेला मोठे भगदाड पडले आहे. मात्र, खचून न जाता, गेलेत त्यांचा विचार न करता ( cm thackeray appeal shivsena party workers ) विभागवार मेळावे लावा, शाखा पिंजून काढा, असे आदेश मुख्यमंत्री ( cm thackeray meeting with Shiv Sena division chief ) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना विभागप्रमुखांना दिले आहे.

cm thackeray meeting with Shiv Sena division chief
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 24, 2022, 10:49 AM IST

मुंबई - शिवसेनेच्या आमदारांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( cm uddhav thackeray on hindutva ) यांच्या विरोधात बंड पुकारल्याने सेनेला मोठे भगदाड पडले आहे. मात्र, खचून न जाता, गेलेत त्यांचा विचार न करता ( cm thackeray appeal shivsena party workers ) विभागवार मेळावे लावा, शाखा पिंजून काढा, असे आदेश मुख्यमंत्री ( cm thackeray meeting with Shiv Sena division chief ) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना विभागप्रमुखांना दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईतील सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. दरम्यान, सर्वांनी पुन्हा जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदारांना धमकावू नका, परिणाम भोगावे लागतील: नारायण राणे

मविआ सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सुरत गाठून बंड पुकारले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत युती करण्याची भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांचा प्रस्ताव नाकरला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत युती करण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदेनी भाजपसोबत युती करण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, शिवसेनेच्या ३७ आणि अपक्ष ९ आमदारांना गळाला लावले. शिवसेना पक्षाच्या चिन्हावर दावा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे. शिवाय विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे आणि प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करावी, असे पत्र विधिमंडळ उपाध्यक्ष यांना पाठवले आहे. तसेच शिवसेनेचे नाव आणि पक्षाचे चिन्ह मिळावे यासाठी दावा केला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांची नुकतीच बैठक घेतली. यावेळी, मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यांवर आजही काम आहोत. जे गेले त्याचा विचार करू नका. आपल्याला आणखीन ताकदीनं लढायचं आहे. विभागावर मेळावे लावा, शाखा पिंजून काढा. त्यासाठी आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना जोर लावून पक्षबांधणीसाठी योगदान द्यावे लागेल, असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, पक्षाविरोधात बंड केलेल्या 12 आमदारांच्या विरोधात कारवाई करा, त्यांचे सदस्यत्व रद्द करा, अशा आशयाचे पत्र शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना देण्यात आले आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली असून, पहिल्या टप्प्यात 12 नावे दिली असून उरलेल्यांवर कारवाईची मागणी करू, असेही म्हटले आहे.

हेही वाचा - Sanjay Raut Slammed Narayan Rane : नारायण राणे यांची भूमिका भाजपची असेल तर त्यांनी तसे घोषित करावे- संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.