ETV Bharat / city

महिलांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने बैठक झाली. यामध्ये महिलांच्या विकासाच्या योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी उपाय योजनांवर चर्चा झाली.

author img

By

Published : Nov 6, 2020, 10:49 AM IST

Updated : Nov 6, 2020, 11:25 AM IST

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - महिलांच्या विकासाला बळ देण्याची आवश्यकता आहे. महिला विकासाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे. यामध्ये लक्ष देण्याची आपली भूमिका आहे. महिलांचे प्रश्न आणि समस्या तसेच त्यांच्यासाठीच्या योजनांना गती देणे. सध्याच्या योजनांतील अडचणी दूर करणे, नवीन योजना आखणे यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) अध्यक्षा ज्योती ठाकरे, जल जीवन मिशनच्या संचालक आर विमला, माविमच्या महाव्यवस्थापक कुसुम बाळसराफ, माजी महापौर विशाखा राऊत, गीता कांबळी, संगीता हसनाळे, रंजना मेवाळकर उपस्थित होते.

बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादननिर्मिती -

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, महिलांनी आता बचत गट आणि त्यांची पारंपरिक पापड, मसाले आदी उत्पादने याच्यापलिकडे जाऊन नवीन संधी शोधल्या पाहिजेत. महिलांच्या जीवनमानात बदल होण्यासाठी उद्योगशीलतेत वाढ करत ‘विकेल ते पिकेल’ या धर्तीवर आधुनिक बाजारपेठेच्या मागणीशी उत्पादननिर्मितीची सांगड घालावी लागेल. त्यासाठी माविम, उमेदच्या (राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान) उपक्रमांना व्यापक स्वरुप देत महिलांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीचे कार्यक्रम अधिक गतीने हाती घ्यावे लागतील, असेही ते म्हणाले.

ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्म -

सेवाक्षेत्राची होत असलेली प्रचंड वाढ पाहता महिलांनी आता केवळ वस्तून‍िर्मितीपर्यंतच मर्याद‍ित न राहता सेवाक्षेत्रातील संधींकडे पाह‍िले पाहिजे. एनआरएलएमने ज्याप्रमाणे बचतगटांची उत्पादने ॲमेझॉन ऑनलाईन व‍िक्री प्लॅटफॉर्मवर टाकली आहेत. तसेच माविम ज्या प्रकारे स्वत:चे ई-बिझनेस प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. त्याप्रमाणे महिलानिर्मित उत्पादनांना व्यापक प्रमाणात ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला पाहिजे. महिला बचत गटनिर्मिती वस्तू विक्रीसाठी ‘द‍िल्ली हाट’च्या धर्तीवर मार्ट उभारली जावीत. आदी मागण्या या बैठकीत करण्यात आल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगितले.

मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव स्मिता निवतकर यांनी महिला विकासाच्या योजनांची माहिती संकलित केलेली पुस्तिका यावेळी सादर केली.

हेही वाचा- 'या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे': सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने बनवले रेल्वेचे घर

हेही वाचा- राज्याने स्वतंत्र कृषी कायदा करून ‘एमएसपी’ अनिवार्य करावी; अशोक चव्हाणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Last Updated : Nov 6, 2020, 11:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.