ETV Bharat / city

CM Shinde Review Meeting Mumbai : पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - CM Eknath Shinde

मुंबई येथे मंत्रालयात (Ministry) राज्यातील गडचिरोली, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा (CM Shinde Review Meeting) घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बैठक घेतली. यामध्ये त्यांनी पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुध्द आराखडा आखण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले. तर वीज अटकाव यंत्रणा ही देखील प्रभावीपणे राबवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री शिंदे
author img

By

Published : Jul 20, 2022, 8:58 PM IST

मुंबई : पावसामुळे वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेता, पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुध्द आराखडा आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जलसंपदा विभागाला दिले. राज्यातील गडचिरोली, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा (CM Shinde Review Meeting) बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. मंत्रालयात (Ministry) झालेल्या या बैठकीत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भुषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव (बांधकाम) मनोज सौनिक,अपर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधानसचिव असिम कुमार गुप्ता उपस्थित होते.

कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश : गडचिरोली, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात आपत्ती विषयक मदत व बचाव कार्यासाठी असलेल्या यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर कार्यरत आहेत. पूर ओसरल्यानंतर जलजन्य आजारांचा फैलाव वाढू नये, म्हणून स्थानिक आरोग्य यंत्रणांनी तात्काळ खबरदारी घ्यावी. नद्यांची पात्रे गाळ साचल्यामुळे उथळ झाली आहेत. पात्रांचे खोलीकरण व रूंदीकरण केल्याने नद्यांचे प्रवाह पूर्ववत होण्यासाठी मदत होईल. यासाठी जलसंपदा विभागाने नदया तसेच धरणे यातील गाळ काढण्याबाबत योग्य त्या कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.

वीज अटकाव यंत्रणा प्रभावीपणे राबवा : पूरग्रस्त भागात पूरामुळे ज्या नागरिकांचा मृत्यू ओढवला त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत वितरीत झाली आहे. तरीही जे लोक या आपत्तीत जखमी असून उपचार घेत आहेत. त्यांच्यावर उपचार देखील वेळेत होण्याबाबत खबरदारी घेण्यात यावी. पूरग्रस्त भागातील शेती तसेच इतर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून, त्याचे प्रस्ताव शासनाला सादर करा. कोणताही आपत्तीग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये, याची खबरदारी प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी. राज्यात पावसामुळे झालेल्या 109 मृत्यू पैकी साठ टक्के मृत्यू हे वीज पडून झालेले आहेत. त्यामुळे पावसाळयात अंगावर वीज पडून मृत्यू होवू नयेत म्हणुन, वीज अटकाव यंत्रणा ही देखील प्रभावीपणे राबवा. वीज अटकाव यंत्रणा राबविण्यासाठी तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मदत व पुनर्वसन विभागाने काम करावे, अशा सूचना देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत दिल्या.

हेही वाचा : Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पूरग्रस्त भागाची पाहाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.