ETV Bharat / city

CM On Farmer : शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचा संकल्प - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी कामाचा धडाका लावला आहे. राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याबरोबरच महाराष्ट्राच्या हिताचे प्रकल्प राबवण्यावर भर दिला जाईल. तसेच, महाराष्ट्र राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचा संकल्प असल्याची अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

CM On Farmer
CM On Farmer
author img

By

Published : Jul 1, 2022, 5:33 PM IST

मुंबई - राज्यात सत्तापालट झाली असून भाजप आणि एकनाथ शिंदे गट सत्तेवर आला आहे. एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पहिल्याच दिवशी कॅबिनेट बैठकीत मेट्रो-३ आरे कारशेड प्रकल्प मार्गे लावण्याची घोषणा केली. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. ते कमी करण्यासाठी नवे संकल्प राबवणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राच्या हिताचे प्रकल्प राबवणार - मुंबईसह राज्यात विविध प्रकल्प खोळंबले आहेत. ते उभारणीवर भर दिला जाईल. तसेच रखडलेले मेट्रो, बुलेट ट्रेन, न्हावा-शेवा जलवाहतूक प्रकल्पांना गती दिली जाईल. नियोजित वेळेत हे प्रकल्प कसे पूर्ण होतील, याकडे राज्य सरकार लक्ष असेल. जनतेच्या पैशाचा गैरवापर होऊ न देता महाराष्ट्राच्या हिताचे प्रकल्प राबवले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आपत्कालीन व्यवस्थापन बैठक - राज्यसह मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावली आहे. पावसाचा आढावा घेऊन बैठकीत उपाययोजना, खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या जातील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

आमच्याकडे संख्याबळ - एकनाथ शिंदे यांच्या रूपाने राज्याला विसावे मुख्यमंत्री मिळाले. मात्र, हे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आमच्याकडे संख्या व असून दिवसागणित यात वाढ होत आहे. उद्या विश्वासदर्शक ठरावात सगळे चित्र स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा - Sanjay Raut ED Case : संजय राऊत ईडी कार्यालयात हजर, काय आहे नेमके प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.