मुंबई : देशात सध्या साखर निर्यातीसाठी खुले धोरण असावे असे पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. सध्या साखर निर्यातीसाठी कोटा पद्धत ( Quota system in sugar export ) आहे. त्यामुळे साखर नियातीवर बंधन आहेत. याचा फटका साखर कारखान्यांना बसत असल्याने ही पद्धत बदलून पंतप्रधानांनी साखर निर्यात खोली करावी अशी विनंती या पत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांना केली आहे. साखर निर्यातीत कोटा पद्धत असल्यामुळे या पद्धतीला साखर कारखानदार विरोध करत आहेत. यावर्षीही राज्यात विक्रमी साखर उत्पादन आहे. मात्र कोठा निर्यात पद्धतीमुळे निर्यातीवर बंधन आहेत. त्यामुळे यात पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा आणि निर्यातीवरील बंधणे उठवून खुले निर्यात धोरण घेणे द्यावे असे पत्रात म्हणण्यात आले आहे.
कोठा निर्यात पद्धत अवलंबली जाणार : गेल्या वर्षी भारताने खुली निर्यात धोरण स्वीकारले होते. यातून जगभरात साखर निर्यात करणारा मोठा निर्यातदार देश म्हणून भारत देश ठरला होता. या धोरणामुळे साखर कारखानदारांना मोठा आर्थिक लाभ झाला. कारखानदारांमध्ये आर्थिक स्थैर्य आले. देशातही मोठ्या प्रमाणात परकीय चलन यायला मदत झाली होती. मात्र यावर्षी कोठा निर्यात पद्धत अवलंबली जाणार असल्याने याचा फटका साखर उद्योगाला बसणार आहे. त्यामुळे कारखानदाराचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ब्राझील हा साखर उत्पादनातला जगातील सर्वात मोठा देश असून, त्यांच्या देशाकडून खुली निर्यात धोरण स्वीकारण्यात आले आहे.
काय लिहीले मुख्यमंत्र्यांनी पत्रात ? ब्राझीलच्या साखर धोरणामुळे खुल्या बाजारातही स्पर्धा आहे. त्यातच कच्च्या तेलाच्या किंमती अधिक असल्यामुळे ब्राझीलने इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. मात्र येणाऱ्या काळात कच्च्या तेलाच्या किंमती घसरण्याची शक्यता असल्याने ब्राझील इथेनॉल उत्पादन वगळता साखर उत्पादनावर भर देईल. त्यामुळे भारताचा तोटा होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आताच भारताने खुली निर्यात धोरण स्वीकारल्यास त्याचा चांगला फायदा देशाला होईल असं पत्रात मुख्यमंत्र्यांकडून नमूद करण्यात आले आहे.