ETV Bharat / city

CM Eknath Shinde statment : नव्या प्रकल्प, उद्योगांसाठी सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Yashwantrao Chavan Foundation in Mumbai

वेदांतासारखा महत्त्वकांक्षी प्रकल्प राज्य सरकारमधील गुजरातला गेल्यानंतर झोपेतून खडबडून जागे झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतर्क झाले आहेत. आगामी काळात नव्या प्रकल्प उद्योगांसाठी सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करेल, सगळ्या सोयी - सुविधांची पूर्तता करून देईल, असा ठामपणे केला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ( Yashwantrao Chavan Foundation in Mumbai ) मुख्यमंत्री शिंदे बोलत ( CM Eknath Shinde statment ) होते.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Sep 16, 2022, 5:55 PM IST

मुंबई - वेदांतासारखा महत्त्वकांक्षी प्रकल्प राज्य सरकारमधील गुजरातला गेल्यानंतर झोपेतून खडबडून जागे झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतर्क झाले आहेत. आगामी काळात नव्या प्रकल्प उद्योगांसाठी सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करेल, सगळ्या सोयी - सुविधांची पूर्तता करून देईल, असा ठामपणे केला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ( Yashwantrao Chavan Foundation in Mumbai ) मुख्यमंत्री शिंदे बोलत ( CM Eknath Shinde statment ) होते.

वेदांता आणि राज्य सरकारमध्ये जुलै महिन्यात कराराबाबत बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कंपनीच्या सीओओनी प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याची ग्वाही दिली. मात्र, अचानक हा प्रकल्प गुजरातला गेला, अशी माहिती समोर आली आहे. विरोधकांनी या वरून सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जडत आहेत. कंपनीच्या अध्यक्ष अग्रवाल यांनी ही या वादावर स्पष्टीकरण देत फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिले.

वेदांत प्रकल्पाबाबत कुठेही प्रयत्न कमी पडले नाही सरकार राज्यात येऊन दोन महिने झाले. दोन वर्षापासून वेदांत प्रकल्पाबाबत बैठक सुरू होत्या. आमचे सरकार आल्यानंतर वेदांतांच्या मागण्यांबाबत तातडीने बैठक घेतली. वेदांताला सबसिडी बाबत ऑफर दिली. पत्र लिहिली, कुठेही प्रयत्न कमी पडलो नाही. परंतु, दीड-दोन वर्षांपासून प्रतिसाद मिळाला नाही. आधीच आलेला अनुभव आणि बदललेल्या सरकारमुळे वेदांता गुजरात मध्ये गेले. आमचे सरकार येण्याअगोदर कितीतरी महिने त्यांनी हा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री शिंदे ( Government make all efforts for new projects ) म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती राज्यात मोठ्या इंडस्ट्री आणि रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आता पंतप्रधानांना विनंती केली आहे, राज्यात मोठ्या इंडस्ट्री आणि रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. प्रधानमंत्री आश्वासन दिले आहे. केंद्र सरकार मोठे सहकार्य करेल. तसेच दुसरा उद्योग वेदांत महाराष्ट्रात आणणार आहे, ही सकारात्मक भूमिका आहे. दुर्दैवाने आदी घडायला नको होते ते घडले. आम्ही त्या राजकारणात जाणार नाही मात्र यानंतर राज्यात मोठे उद्योग कसे येतील, यासाठी प्रयत्न आणि संबंधितांच्या अपेक्षाही पूर्तता करू, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.