ETV Bharat / city

CM Eknath Shinde मुख्यमंत्री गणेश दर्शन दौऱ्यावर राज्य वाऱ्यावर; मंत्रिमंडळ बैठक घेण्यास मिळेना मुहूर्त - मुख्यमंत्री गणेश दर्शन दौऱ्यावर

शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात करत नव्या सरकारचे धोरण जगजाहीर केले. पावसाळी विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची एकही बैठक झालेली cabinet meeting after monsoon session नाही. त्यामुळे राज्य वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील विविध भागात गणेश दर्शन दौरे करत असल्याचे बोलले जात आहे.CM Eknath Shinde not held single cabinet meeting after monsoon session

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Sep 9, 2022, 5:53 PM IST

मुंबई- शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात करत नव्या सरकारचे धोरण जगजाहीर केले. मात्र, अवघ्या तीन महिन्यात सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी जीवन संपवले. अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे त्यात भर पडत आहे. मात्र शेतकरी हवालदिल होत असताना, पावसाळी विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची एकही बैठक झालेली CM Eknath Shinde not held single cabinet meeting नाही. त्यामुळे राज्य वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील विविध भागात गणेश दर्शन दौरे CM Ganesh Darshan करत असल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. भाजपने काळजावर दगड ठेवत, शिंदे यांना मुख्यमंत्री केले. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्यात शेतकरी आत्महत्यामुक्त संकल्प जाहीर केला. परंतु, सरकार स्थापन होऊन दीड महिना उलडून गेला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. शेतकऱ्यांची काळजी असलेले कृषी मंत्रालय ही मंत्र्याविना ओस तर मुख्यमंत्री शिंदे दिल्लीवारीत व्यस्त होते. अखेर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार मार्गी लागला आणि राज्याचा गाढा चालू झाला. मात्र, अद्याप पालकमंत्री नेमलेले नाहीत. शिवाय पावसाळी अधिवेशनानंतर गेल्या एकही कॅबिनेट बैठक झालेली नाही. त्यात गणेशोत्सव आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्रौदिवस गणेश दर्शन दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राज्याला वाली कोण असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

नऊ दिवसात शेकडोजणांच्या भेटीगाठी आगामी महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच पक्षाने राजकीय मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. गणेशोत्सव मंडळांना आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्षांच्या इच्छूकांसह इतरही प्रयत्न करीत आहेत. शिंदे गटानेही हालचाली वाढवल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसरात्र मुंबईसह राज्यातील लहान, मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना, घरगुती गणपतींना भेटी दिल्या. दरम्यान, सुमारे नऊ दिवसांत शेकडो गणेशमूर्तींचे दर्शन घेतले. दिवस रात्र मुख्यमंत्री दौरे करत असताना राज्यात ओढवलेल्या पूरस्थिती आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंतेत असताना मुख्यमंत्री शिंदे यांचे गणेश दर्शन चांगलेच चर्चेत राहिले.

जनता वाऱ्यावर शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत महाराष्ट्र शासनाने बळीराजा चेतना अभियान, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन स्थापन केले होते. सध्या हे दोन्ही उपक्रम बासनात गुंडाळले आहेत. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांत सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. औरंगाबाद, बीड, यवतमाळ जिल्ह्यांत सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापेक्षा हा आकडा मोठा आहे. एकीकडे शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांचे सरकार सांगायचे आणि राज्य वाऱ्यावर सोडायच, अशा शब्दांत विरोधकांनी शिंदेंवर टीकेची झोड उठवली.

आरोप - प्रत्यारोप सध्याच्या काळात सर्वसामान्य लोकांची कामे होत नाहीत. मुख्यमंत्री मंत्रालयात नसतात. गणेशोत्सव काळात गणेश दर्शन घेत फिरत आहेत. आत्ता गणेशोत्सव आहे, पुढेही अनेक उत्सव येतील. त्यामुळे महाराष्ट्राला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक फिरायला एक मंत्रालयात बसून लोकांची कामे करायला. यामुळे एक मुख्यमंत्री मंत्रालयात बसून काम करू शकतील आणि दुसरे मुख्यमंत्री जे वेगवेगळ्या पद्धतीने फोटोसेशन आणि गणपती दर्शन करत बसतील, असा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी साधला आहे. कित्येक दिवस कॅबिनेट बैठक झाली नाही, असे सुळेमागील अडीच वर्षात ज्या पद्धतीने काम सुरू होते. सरकार एकाचे आणि चालवत दुसरा होता, तशीच भावना आता निर्माण झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी भरीव मदत दिली आहे. आता आम्ही कामातून उत्तरे देऊ, असा सूचक इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. CM Eknath Shinde not held single cabinet meeting after monsoon session

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.