मुंबई - कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Home Minister Amit Shah mumbai visited यांनी मुंबईत येऊन मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी Mumbai Municipal Corporation Elections १५० चा नारा दिल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी, शिंदे गट व भाजपाच्या आमदारांना तसेच मंत्र्यांना त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी स्नेह भोजनासाठी आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे या स्नेहभोजनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे MNS President Raj Thackeray यांना सुद्धा आमंत्रित केले जाणार असल्याची चर्चा आहे. येणाऱ्या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने या स्नेहभोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चारी मुंड्या चित करण्याचे प्रयत्न? : राज्यात नाट्यमय सत्तांतरानंतर शिंदे व फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर या सरकारसाठी येणारी मुंबई महानगरपालिका निवडणूक हे पहिले आव्हान असणार आहे. त्यातच कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप नेते, कार्यकर्त्यांना संबोधित करताना कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर १५० नगरसेवक निवडून आणण्याचं टार्गेट दिलं असल्याकारणाने आता फक्त भाजपच नाही तर शिंदे गटासाठी सुद्धा ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीसाठी ज्या पद्धतीने अमित शहा यांनी भाजप नेत्यांना काल संबोधित करताना," कही भी मारा तो चोट लगती है, पर घर के सामने मारा तो दिल को चोट लगती है." या शब्दात मुंबईच्या मैदानातच शिवसेनेला चारी मुंड्या चित करायचे आवाहन भाजप नेत्यांना केले. परंतु हे आव्हान पेलण्यासाठी आता भाजप बरोबर शिंदे गटाचे आमदार सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतील आणि म्हणूनच त्या अनुषंगाने आज हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे.
मनसेची साथ लाख मोलाची? : यंदा मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाबरोबर मनसे युती करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवली जात आहे. कारण मिशन १५० टार्गेट पूर्ण करायच असेल तर मुंबईमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेला शह देणे तितकं सोपं नाही, हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहीत आहे. म्हणूनच मराठी मतांमध्ये फूट पडता कामा नये व ती पडली तरी मराठी मत आपल्या बाजूने कशी घेता येतील या संदर्भामध्ये सुद्धा सविस्तर चर्चा झाल्यानंतर शिंदे गटासोबत राज ठाकरे यांच्या मनसेला सुद्धा घेण्याची तयारी सुरू आहे व त्या अनुषंगाने या बैठकीला राज ठाकरे यांना सुद्धा बोलवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदाचा दसरा मेळावा महत्त्वाचा? : शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा नक्की यंदा कोणाचा होईल यावरून राजकीय चर्चा रंगू लागल्या असताना दुसरीकडे शिंदे गटाने बीकेसी मधील एमएमआरडीए मैदान हे सुद्धा एक पर्याय जागा म्हणून राखून ठेवले आहे परंतु यंदाचा दसरा मेळावा हा शिंदे गट व त्याचबरोबर उद्धव ठाकरे गट यांच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. कारण राज्यात ज्या पद्धतीने नाट्यमय सत्तांतर झाले आहे त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्याची सहानुभूती भेटण्याची शक्यता सुद्धा राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे. व त्या अनुषंगाने सुद्धा आजच्या स्नेहभजनाच्या निमित्ताने या बैठकीत कानमंत्र दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट!