मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मुंबईतील आरएसएस कार्यालयात भेट घेतली. या भेटीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा पुस्तक देऊन सत्कार केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी मोहन भागवत यांचे शाल देऊन स्वागत ( CM, DCM Meet Rss Chief Mohan Bhagwat ) केले.
-
Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis meets RSS chief Mohan Bhagwat at the RSS office in Mumbai. pic.twitter.com/CBCU5QpqWG
— ANI (@ANI) August 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis meets RSS chief Mohan Bhagwat at the RSS office in Mumbai. pic.twitter.com/CBCU5QpqWG
— ANI (@ANI) August 1, 2022Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis meets RSS chief Mohan Bhagwat at the RSS office in Mumbai. pic.twitter.com/CBCU5QpqWG
— ANI (@ANI) August 1, 2022
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा? - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे राष्ट्रीय स्वयसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. तब्बल पाऊण तास दोघेही भागवतांसोबत होते. मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच, महिना झाला तरी शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. न्यायालयाकडूनही शिंदे गटाच्या याचिकेवर निर्णय आलेला नाही. तसेच, राज्यातील वातावरण बिघडले आहे, यासंदर्भामध्ये सुद्धा या भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चर्चांना उधाण? - एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण कोणतही पद स्वीकारणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, पक्ष श्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्रिपद घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर फडवणीस नाराज असल्याची चर्चा रंगली होती. या दिवसांत त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस हे एकटेच होते. परंतु, आज मुख्यमंत्री व मुख्य उपमुख्यमंत्री या दोघांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची तब्बल पाऊण तास भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
'ही एक सदिच्छा भेट' - या भेटीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'मोहन भागवत यांच्यासोबतची भेट एक सदिच्छा भेट होती. या भेटीसाठी मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो. एका कार्यक्रमातून आम्ही तिथे एकत्र आलो आणि आमची भेट झाली. मोहन भागवत साहेब आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यामुळे मी त्यांना ठाण्यालाही भेटलो. नव्या सरकारसाठी त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेतले. त्यांची ही भूमिका बाळासाहेबांच्या विचाराचीच आहे,' अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
-
Maharashtra | We met RSS Chief after taking charge as CM and DCM. We have also met him in past, our govt is formed on the ideology of Hindutva and we took his blessings for the same. We are taking forward the ideology of Balasaheb Thackeray: CM Eknath Shinde pic.twitter.com/2BuJCliYhE
— ANI (@ANI) August 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra | We met RSS Chief after taking charge as CM and DCM. We have also met him in past, our govt is formed on the ideology of Hindutva and we took his blessings for the same. We are taking forward the ideology of Balasaheb Thackeray: CM Eknath Shinde pic.twitter.com/2BuJCliYhE
— ANI (@ANI) August 1, 2022Maharashtra | We met RSS Chief after taking charge as CM and DCM. We have also met him in past, our govt is formed on the ideology of Hindutva and we took his blessings for the same. We are taking forward the ideology of Balasaheb Thackeray: CM Eknath Shinde pic.twitter.com/2BuJCliYhE
— ANI (@ANI) August 1, 2022
'हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भेट' - तर भेटीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'या भेटीत शंभर टक्के हिंदुत्वाचा मुद्दा तर आहेच. यावेळी सरसंघचालकांनी सांगितले की चांगले काम करा. एकमेकांना सोबत घेऊन राज्याचे राजकारण पुढे न्या. तसेच, मुख्यमंत्र्यांना सरसंघचालकांची भेट घ्यायची होती. त्यामुळे ही भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली,' असे उपमुख्यमंत्री फडवणीसांनी सांगितलं.