ETV Bharat / city

Neelam Gorhe : शक्ती कायद्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा; नीलम गोऱ्हेंचे निर्देश - नीलम गोऱ्हे एकनाथ शिंदे मराठी बातमी

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंमलात आणलेला शक्ती कायदा केंद्र शासनाच्या मंजुरी अभावी रखडला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले ( Neelam Gorhe On Shakti Law ) आहेत.

Neelam Gorhe
Neelam Gorhe
author img

By

Published : Aug 6, 2022, 4:48 PM IST

मुंबई - भंडारा जिल्ह्यातील एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. त्याप्रकरणी फरार आरोपींना अटक करुन तात्काळ कारवाई करावी. तसेच, अशा घटना रोखण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंमलात आणलेला शक्ती कायदा केंद्र शासनाच्या मंजुरी अभावी रखडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Dcm Devendra Fadnavis ) केंद्राकडे यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. हा कायदा मंजूर झाल्यास महिलांना न्याय मिळेल, असेही त्या म्हणाल्या. 'ईटीव्ही भारत'शी गोऱ्हे यांनी संवाद साधला ( Neelam Gorhe On Shakti Law ) आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

आरोपींवर कारवाई करा - भंडारा जिल्ह्यात एका महिलेला घरी सोडतो असे सांगत जंगलात नेऊन सलग दोन दिवस अमानुषपणे अत्याचार करण्यात आला. आणखीन दोघांनीही अशाच प्रकारचे कृत्ये केले. महिलेवर पाच शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. ही दुर्दैवी घटना आहे. घटनेतील मूळ आरोपी अद्याप पकडला गेला नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे. फरार आरोपींवर तात्काळ अटक करून कठोर कारवाई, असे गोऱ्हे यांनी पोलिसांना सुचना दिल्या आहेत.

केंद्राकडे पाठपुरावा करावा - तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा अंमलात आणला आहे. सर्वपक्षीयांनी कायदा करण्यासाठी सहकार्य केले आहे. हा कायदा केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. केंद्र सरकारने अद्याप मान्यता दिलेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्ती कायदा केंद्राकडून मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात हा कायदा मंजूर झाला आहे महिलांवरील अत्याचाराला जरब बसेल, असेही गोऱ्हे यांनी म्हटलं.

हेही वाचा - Bhandara Rape Case : भंडारा सामूहिक अत्याचाराचा तपास फास्ट ट्रॅकवर; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.