ETV Bharat / city

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या आग्रहाखातर देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केले- चंद्रकांत पाटील. - एकनाथ शिंदे

काल महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, या सरकारमध्ये मी सामील होणार नाही, असे सांगणारे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी काही वेळातच आपला शब्द बदलत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या कारणास्तव ह्या राजकीय घडामोडीची चर्चा सर्वत्र रंगली असताना याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state president Chandrakant Patil ) यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली आहे.

At the request of Eknath Shinde, Devendra Fadnavis was made Deputy Chief Minister - Chandrakant Patil.
एकनाथ शिंदे यांच्या आग्रहाखातर देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केले- चंद्रकांत पाटील.
author img

By

Published : Jul 1, 2022, 7:09 PM IST

मुंबई - काल महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, या सरकारमध्ये मी सामील होणार नाही, असे सांगणारे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी काही वेळातच आपला शब्द बदलत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या कारणास्तव ह्या राजकीय घडामोडीची चर्चा सर्वत्र रंगली असताना याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state president Chandrakant Patil ) यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहाखातरच देवेंद्र फडवणीस यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फार मोठं मन करून त्यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आहे असेही ते म्हणाले.

आम्ही हिंदुत्वाशी एकनिष्ठ - या प्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, एका मोठ्या राजकीय परिवर्तनानंतर याचा सर्वांना धक्का बसला. त्याच स्पष्टीकरण मी आज करत आहे. हिंदुत्वाच्या आधारे भारतीय जन संघाची स्थापना झाली. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. हिंदुत्व ज्यांनी मानलं नाही त्यांच्या मांडीला मांडी लावून काहीजण बसले. म्हणून यांचा विरोध जो होता तो विकासासाठी व हिंदुत्वासाठी होता. आम्ही राम मंदिरासाठी जो निधी दिला त्यावर ही टीका केली. महाविकास आघाडी सरकारने अजाणला विरोध केला. मेट्रोला विरोध, एस टी कमर्माचारी आंदोलन चिरडून टाकले. मराठा, ओ बी सी, धनगर आरक्षण नाकाम केले. असा आरोप पाटील यांनी केला.

आम्ही सत्तेचा मोह केला नाही? पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी अस्वस्थ आमदारांना स्वतंत्र केले.
आमचे बहुमत स्पष्ट असताना सुद्धा आम्ही सतेचा मोह केला नाही. तर, सामान्य माणसाला एका शिवसैनिकाला आम्ही मुख्यमंत्री केले. सत्तेचा मोह आम्हाला नाही तुम्हाला आहे. त्यासाठी तुम्ही हिंदुत्व सोडले. आम्ही त्याग केला त्याचा आम्हाला अभिमान आहे. प्रशासनाची उत्तम जाण असल्या कारणाने एकनाथ शिंदे यांनी आग्रह धरला की देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करा. त्यासाठी ते राजी झाले. फार मोठे मन देवेंद्र फडणवीस यांनी दाखवले असल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या मध्ये फूट पडण्याचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस यांची राजकीय उंची कमी करण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री केले. अशा चर्चा सुरू झाल्या आहेत, त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, या विरोधकांनी रचलेल्या या बातम्या आहेत. आमच्यातील अत्यंत सलोख्याची नाती ज्यांना पटत नाही त्यांनी या बातम्या पेरल्या आहेत. प्रसंगाला मान कापून द्यायची आमची तयारी असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा - CM On Farmer : शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचा संकल्प - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.