मुंबई: दसरा मेळाव्यातून शिवसेना कुणाची हा फैसला करण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray आणि शिंदे गटाने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी कंबर कसली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते जमवण्यासाठी मुंबई दर्शन, रोजंदारी, खाणे- पिणे आणि नाष्टा देण्याची आमिषे दाखवण्यास सुरुवात झाली आहे. रात्रंदिवस दोन्ही गटाचे पदाधिकारी यासाठी घराघरात ठाण मांडून बसत आहेत. दसरा मेळाव्यात मोठी गर्दी जमवून कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे Shivsena Dasara Melava आहे.
आम्हीच खरी शिवसेना हे दाखवण्यासाठी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु Preparations Dussehra Mela begun आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरु झाली आहे. शिंदेंकडून बिकेसी मैदानात रेकॉर्डब्रेक गर्दी जमवण्याचा निर्धार केला आहे. दोन्ही मैदाने भरगच्च करण्यासाठी दोन्ही गट जंगजंग पछाडत असून बैठकींचा सपाटा लावला आहे. शिवसेना कुणाची हा निर्णय निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयात लागण्याआधी दसऱ्याच्या दिवशी आम्हीच खरी शिवसेना हे दाखवण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न आहे. शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत तर बीकेसी मैदानात तीन लाख शिवसैनिकांची गर्दी जमण्याचे टार्गेट आहे.
दर्शन, रोजंदारीची आमिषे रोजगार हमी योजना खात्याचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या संभाजीनगरमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला पैसे देऊन माणसे आणली होती. या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने भुमरेंची भंडाफोड झाली. विरोधकांनी यावरून शिंदे सरकारवर टीकेची धार तीव्र केली होती. आताही शिंदे गटाकडून रोजंदारी, मुंबई दर्शन, खाणे- पिणे, नाश्ता, जेवण आदी अमिष दाखवून कार्यकर्ते सभेला आणली जाणार आहेत. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पदाधिकारी देखील यात मागे राहिलेले नाहीत.