ETV Bharat / city

राणेंना आव्हान देणाऱ्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री ठाकरेंनी थोपटली पाठ

दिवसभरात नारायण राणे यांना अटक आणि शिवसेना भाजपाचा राडा प्रकरण सुरू असतानाचा, युवासेनेने लक्षवेधून घेतल्याचे दिसून येत होते. त्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी वरून सरसाई देखील उपस्थित होते. यावेळी ‘शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केल आहे.

युवासेनेच्या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री ठाकरेंनी  थोपटली पाठ

author img

By

Published : Aug 25, 2021, 12:00 PM IST

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मंगळवारी राज्यात भाजपा शिवसेनेत जोरदार राडा पहायला मिळाला. राणेंच्या वक्तव्यांवर युवा सेना चांगलीच आक्रमक झाली होती. युवा सेनेने थेट जुहू येथील राणेंच्या निवास्थानाबाहेर जाऊन निदर्शने केली. यावेळी युवासेना सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरून सरदेसाई यांनी आंदोलनाचे नेतृत्व करत थेट राणे आणि भाजपाला आव्हान दिले होते. युवासेनेच्या या कामगिरीवर खुष होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केले आहे.

युवासेनेच्या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री ठाकरेंनी  थोपटली पाठ
युवासेनेच्या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री ठाकरेंनी थोपटली पाठ
आमदार नितेश राणे यांनी 'घराबाहेर येऊन दाखवा', पोलिसांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अन्यथा जे काय घडेल त्याला आम्ही जबाबदार नसू आणि सिंहाच्या गुहेत शिरण्याची हिंमत कोणी करू नये असे आव्हान शिवसेनेला दिले होते. या आव्हाननंतर आक्रमक झालेली युवासेना थेट त्यांच्या घराबाहेर जाऊन घोषणाबाजी केली. यावी राणे समर्थक आणि युवा सेना कार्यकर्ते भिडल्याचेही यावेळी दिसून आले. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या वेळी परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला होता. या लाठीचार्जमध्ये दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाले होते.दिवसभरात नारायण राणे यांना अटक आणि शिवसेना भाजपाचा राडा प्रकरण सुरू असतानाचा, युवासेनेने लक्षवेधून घेतल्याचे दिसून येत होते. त्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी वरून सरसाई देखील उपस्थित होते. यावेळी ‘शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केल आहे.कोण आहेत वरून सरदेसाईवरून सरदेसाई यांच्याकडे युवा सेनेचे सचिव पद आहे. आदित्य ठाकरे यांचे ते मावसभाऊ आहेत. वरुण सरदेसाई हे सिव्हिल इंजिनिअर आहेत. गेल्या वेळी मुंबई सिनेट निवडणुकीच्या युवासेनेच्या व्यूहरचनेत वरुण सरदेसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.