ETV Bharat / city

प्रचारादरम्यान माहुलवासीयांचा मनोज कोटक यांना घेराव, तीव्र विरोध पाहून फिरले माघारी - pollution in Mahul

माहुलवासीयांना प्रदूषण नसलेल्या इतर ठिकाणी हलवावे असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिले आहेत.

माहुलवासीयांचा मनोज कोटक यांना घेराव
author img

By

Published : Apr 21, 2019, 5:35 PM IST

मुंबई - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणुकीपूर्वी आणि आता निवडणुकीदरम्यान चर्चेचा विषय ठरला आहे. या मतदारसंघात प्रचार करणारे युतीचे उमेदवार मनोज कोटक यांना रॅली दरम्यान माहुलवासीयांनी घेराव घातला. अखेर स्थानिकांचा तीव्र विरोध पाहता कोटक यांनी काढता पाय घेणे पसंत केले.

मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे प्रदूषणयुक्त माहुलमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. या विभागात रिफायनरी प्रकल्प असल्याने प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. प्रदूषणामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना त्वचेचे व श्वसनाचे आजार झाले आहेत. विविध आजारांमुळे गेल्या एक ते दीड वर्षात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. माहुलवासियांना प्रदूषण नसलेल्या इतर ठिकाणी हलवावे असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यापोटी दरमहा भाडे आणि डिपॉझिट देण्याचेही न्यायालायने आदेशात म्हटले आहे.

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने आंदोलन-
उच्च न्यायालयाच्या आदेशाची भाजप सरकारकडून अंमलबजावणी केली जात नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी तानसा पाईपलाईन येथे आंदोलन सुरु केले आहे. त्याकडेही सरकार दुर्लक्ष करत असल्याने माहुलवासीय संतप्त झाले आहेत. घाटकोपरपूर्वेकडील शास्त्रीनगर परिसरातील ओएनजीसी कॉलनीत बुधवारी सायंकाळी कोटक यांची पदयात्रा सुरू होती. यावेळी माहुलवासियांनी रॅली अडवत त्यांना घेराव घातला.

माहुलवासीयांचा मनोज कोटक यांना घेराव

रॅली दरम्यान स्थानिक नागरिकांसह माहुलवासियांनी आजपर्यंत तेथील समस्या सोडविला नसल्याचा आणि त्यांना रस्त्यावर आणल्याचा आरोप केला. गेली अनेक वर्षे हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. मात्र स्थानिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा जाब या नागरिकांनी विचारला. यावेळी छेडांसह कोटक यांनी त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांचा तीव्र विरोध पाहून कोटकांनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी भाजपचे प्रवीण छेडा, पराग शाह, खासदार किरीट सोमय्यांसह शिवसेनेचे कार्यकर्तेही हजर होते.

Intro:या बातमीचा व्हिडीओ पोहचला आहे पण स्क्रिप्ट मिळाली नाही असा डेस्कचा फोन होता..पुन्हा ही बातमी पाठवत आहे
बातमी डेस्कच्या व्हाट्सअप्प नंबरलाही टाकली आहे
==================
मुंबई
ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघ निवडणुकीपूर्वी आणि आता निवडणुकीदरम्यान चर्चेचा विषय ठरला आहे. या मतदारसंघात नेहमीच नवे वाद समोर येत आहेत. या मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मनोज कोटक यांची रॅली माहुलवासीयांनी रोखल्याचा प्रकार एका व्हायरल व्हिडीओमधून उघडकीस आला आहे. Body:मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन प्रदूषणयुक्त माहुलमध्ये केले जाते. या विभागात रिफायनरी प्रकल्प असल्याने प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. प्रदूषणामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना त्वचेचे व श्वसनाचे आजार झाले आहेत. त्यात गेल्या एक ते दिड वर्षात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. माहुलवासियांना प्रदूषण नसलेल्या इतर ठिकाणी हलवावे, त्यासाठी त्यांना दरमहा भाडे आणि डिपॉझिट देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार, मुंबई महापालिकेला दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशाची भाजपा सरकारकडून अंमलबजावणी केली जात नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी तानसा पाईपलाईन येथे आंदोलन सुरु केले आहे. त्याकडेही सरकार दुर्लक्ष करत असल्याने माहुलवासीयांना संतप्त भावना आहेत. बुधवारी सायंकाळी घाटकोपर पूर्वे कडील शास्त्रीनगर परिसरातील ओएनजीसी कॉलनीत कोटक यांची पदयात्रा जात असताना माहुल वासियांनी त्यांची रॅली अडवत त्यांना घेराव घातला. यावेळी भाजपाचे प्रवीण छेडा, पराग शाह, खासदार किरिट सोमय्यांसह शिवसेनेचे कार्यकर्तेही हजर होते.

रॅली दरम्यान स्थानिक नागरिकांसह माहुलवासियांनी आजपर्यंत तेथील समस्या सोडविला नसल्याचा आणि रस्त्यावर आणल्याचा आरोप केला. गेली अनेक वर्षे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. मात्र, आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा जाब या नागरिकांनी विचारला. यावेळी छेडांसह कोटक यांनी त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांचा तीव्र विरोध पाहून कोटकांनी तेथून काढता पाय घेतला. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.