मुंबई - दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजार फुलांनी चांगलाच रंगून गेला आहे. दरम्यान, फूल बाजारातील मागणी वाढल्याने यंदाचा दसरा आनंददायी अशी प्रतिक्रया व्यापाऱ्यांनी दिली आहे. फूल बाजारात फुलांची चांगलीच मागणी वाढली आहे.
घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारात मोठी लगबग दिसत आहे
मुंबईतील दादरच्या बाजारात झेंडूच्या फुलांना सणासुदीत मागणी असल्याने यंदा दरही सर्वाधिक होते. झेंडूच्या फुलांना सणासुदीत मागणी असल्याने यंदा दरही सर्वाधिक होते. दादर स्थानकाबाहेरील बाजरपेठेत नागरिकांनी फुले रेदीसाठी गर्दी केली होती. दादर स्थानकाबाहेरील बाजरपेठेत नागरिकांनी फुले खरेदीसाठी गर्दी केली होती. दसऱ्याला झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने पिवळ्या व केशरी रंगाच्या या फुलांची जास्त चलती आहे. ६० ते ८० रुपये किलो दराने मिळणारा झेंडू सध्या १०० ते १४० रुपये प्रतिकिलो आहे. गोंडा व आंब्याच्या पानांचे तयार तोरण ६० ते ८० रुपये प्रतिमीटरने विक्री करण्यात येत असल्याचे फूलविक्रेते प्रकाश दिवे यांनी सांगितले. दादर पश्चिम येथील कविवर्य केशवसुत उड्डाणपुलाखालील स्थानकालगत असलेल्या फूल बाजारात झेंडूची फूले, तोरणे, आपट्याची पाने, आंब्याची पाने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दी मध्ये कोरोनाचे भय मात्र हरवल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.
हेही वाचा - भारतातील 'या' ठिकाणी रावणदहन केले जात नाही, जाणून घ्या इतिहास