ETV Bharat / city

मुंबईत क्लिनअप मार्शलला नागरिकांची मारहाण; मास्क लावण्यावरून उद्भवला वाद - मुंबई कोरोना

मंगळवारी जुहू येथे एका रस्त्यावर एका क्लिनअप मार्शलने एका नागरिकाच्या तोंडावरील मास्क जरा खाली सरकल्याने त्याच्यावर कारवाई करण्याच्या हेतूने त्या नागरिकाचा एक फोटो मोबाईल कॅमऱ्याने काढला. त्यामुळे संबंधित नागरिकाला त्याचा राग आला. या घटनाप्रकरणावरून क्लिनअप मार्शल व त्या नागरिकाचा वाद झाला व त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.

मार्शलला नागरिकांची मारहाण
मार्शलला नागरिकांची मारहाण
author img

By

Published : Sep 14, 2021, 2:44 PM IST

Updated : Sep 14, 2021, 4:17 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नागरिकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी पालिकेच्या 'क्लीनअप मार्शल' कडून नजर ठेवण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर क्लीनअप मार्शलमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र कधी कधी या कारवाईवरून नागरिक आणि क्लीनअप मार्शल यांच्यात वादविवाद होत असतात. मंगळवारी जुहू येथे अशाच एका प्रकरणात कारवाई करण्यावरून एक नागरिक व क्लीनअप मार्शल यांच्यातील वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

मुंबईत क्लिनअप मार्शलला नागरिकांची मारहाण

मंगळवारी जुहू येथे एका रस्त्यावर एका क्लिनअप मार्शलने एका नागरिकाच्या तोंडावरील मास्क जरा खाली सरकल्याने त्याच्यावर कारवाई करण्याच्या हेतूने त्या नागरिकाचा एक फोटो मोबाईल कॅमऱ्याने काढला. त्यामुळे संबंधित नागरिकाला त्याचा राग आला. या घटनाप्रकरणावरून क्लिनअप मार्शल व त्या नागरिकाचा वाद झाला व त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. नागरिकाने त्या क्लिनमार्शवर हात उचलल्याचा आरोप केला. त्यावर तेथे जमलेल्या नागरिकांनी त्या क्लिनअप मार्शलवर हात उगारला. त्यावेळी त्या क्लिनअप मार्शलने जोरदार प्रतिकार केला. मात्र नागरिकांची संख्या वाढल्याने व त्याला मारहाण जास्त होऊ लागल्याने त्याने घटनास्थळापासून वेळीच पळ काढल्याने तो थोडक्यात बचावल्याचे समजते.

सदर प्रकरण पोलिसात गेले असून त्या क्लिनअप मार्शलच्या डोक्याला दुखापत झाल्याने डोक्याचे सिटी स्कॅन करण्यात आले असल्याचे समजते. या घटनेचे तीव्र पडसाद पालिका स्थायी समितीच्या आगामी बैठकीत उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Sep 14, 2021, 4:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.