ETV Bharat / city

२६ कोटींच्या खंडणी प्रकरणी छोटा राजनला दोन वर्षांची शिक्षा

पनवेलमधील बांधकाम व्यावसायिक नंदू वाजेकर यांना 26 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी ही शिक्षा देण्यात आली आहे. याप्रकरणी छोटा राजनसोबत आणखी तीन आरोपींना शिक्षा जाहीर करण्यात आली आहे.

chota-rajan-sent-for-2-years-in-prison-in-ransom-case
बांधकाम व्यावसायिक खंडणी प्रकरणी छोटा राजनला दोन वर्षांची कैद!
author img

By

Published : Jan 4, 2021, 3:30 PM IST

Updated : Jan 4, 2021, 4:05 PM IST

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन 'छोटा राजन'ला दोन वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिक नंदू वाजेकर यांना 26 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी ही शिक्षा देण्यात आली आहे. याप्रकरणी छोटा राजनसोबत आणखी तीन आरोपींना शिक्षा जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येकी पाच हजारांचा दंड आणि दोन वर्षे तुरुंगवास असे या शिक्षेचे स्वरुप आहे. मुंबईच्या मोक्का न्यायालयाने याबाबत निर्णय दिला.

२६ कोटींच्या खंडणी प्रकरणी छोटा राजनला दोन वर्षांची शिक्षा

२०१५चे आहे प्रकरण..

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नंदू वाजेकर या बिल्डरने २०१५मध्ये पुण्यात काही जमीन खरेदी केली होती. यासाठी परमानंद ठक्कर नावाच्या एजंटला दोन कोटी रुपये देण्याची बोली झाली होती. मात्र, ठक्कर याने वाजेकर यांना अधिक पैशांची मागणी केली. वाजेकर यांनी ही मागणी फेटाळताच ठक्करने छोटा राजनशी संपर्क साधला.

त्यानंतर छोटा राजनच्या गुंडांनी वाजेकर यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन धमकी दिली होती, तसेच २६ कोटी रुपयांची मागणीही केली होती. सुरेश शिंदे, लक्ष्मण निकम आणि सुमित विजय मात्रे अशी या तिघांची नावे आहेत. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही वाजेकर यांना देण्यात आली होती.

त्यानंतर नवी मुंबई पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. या संदर्भात पाच हजार रुपये दंड व दोन वर्षाची शिक्षा छोटा राजन सह सर्व चार आरोपींना मोक्का न्यायालयाने सुनावलेली आहे.

चार प्रकरणांत झाली आहे छोटा राजनला शिक्षा..

या अगोदरच्या प्रकरणांमध्ये छोटा राजन यास पत्रकार जे. डे हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेली असून, मुंबईतील आणखी एक बांधकाम व्यवसायिक बी. आर. शेट्टी यांच्यावर गोळीबार करण्यासंदर्भात 8 वर्षांची शिक्षा छोटा राजन याला सुनावण्यात आलेली आहे. याबरोबरच दिल्लीतील बनावट पासपोर्ट प्रकरणी त्यास शिक्षा सुनावण्यात आलेली असून, आज पुन्हा या प्रकरणामध्ये न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली

Last Updated : Jan 4, 2021, 4:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.