ETV Bharat / city

चिपी विमानतळ उड्डाणास सज्ज; 9 ऑक्टोबरला उद्घाटन, मुख्यमंत्री राहणार उपस्थित

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ विमान उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

Chipi airport
चिपी विमानतळ
author img

By

Published : Sep 23, 2021, 10:07 PM IST

मुंबई - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ विमान उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. येत्या ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार आहे.

  • अधिकाऱ्यांची बैठक पडली पार -

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते. दरम्यान, विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या कामाची माहिती यावेळी दिली. उड्डाणासाठी विमानतळ पूर्णपणे सज्ज झाले आहे, अशी माहिती देण्यात आली. उद्घाटनप्रसंगी येणाऱ्या विमानाचे बुकिंग पूर्ण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंह, महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी आदी बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा - चिपी विमानतळ राज्‍याचा प्रकल्‍प, राणेंनी त्यात लुडबूड करू नये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.