मुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने प्रशासनाच्या कामकाजावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत बंद झाली आहे. यामुळे बंद करण्यात आलेला निधी कक्ष तातडीने सुरू करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी राज्यपालांना पत्र लिहले आहे.
-
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्या संदर्भातील पत्र मी मा. राज्यपालांना लिहिले आहे. मा. राज्यपाल महोदय या पत्राची दखल घेत हजारो गरीब रुग्णांना दिलासा देतीलच अशी अपेक्षा आहे. @BSKoshyari pic.twitter.com/l4Vlw9HUQR
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्या संदर्भातील पत्र मी मा. राज्यपालांना लिहिले आहे. मा. राज्यपाल महोदय या पत्राची दखल घेत हजारो गरीब रुग्णांना दिलासा देतीलच अशी अपेक्षा आहे. @BSKoshyari pic.twitter.com/l4Vlw9HUQR
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 14, 2019मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्या संदर्भातील पत्र मी मा. राज्यपालांना लिहिले आहे. मा. राज्यपाल महोदय या पत्राची दखल घेत हजारो गरीब रुग्णांना दिलासा देतीलच अशी अपेक्षा आहे. @BSKoshyari pic.twitter.com/l4Vlw9HUQR
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 14, 2019
हेही वाचा... ओल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राजभवनावर 'प्रहार', बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्याने, राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत देखील बंद झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार धनंजय मुंडे यांनी, राज्यातील गरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी हा कक्ष पुन्हा सुरू करावा, यासाठी राज्यपालांना पत्र लिहत विनंती केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः या पत्राबाबत ट्विट करत ही माहिती दिली.
हेही वाचा... भविष्यात काळजीपूर्वक बोलावं; 'चौकीदार चोर है' वक्तव्यावरील सुनावणीत राहुल गांधींना सल्ला
धनंजय मुंडे आपल्या पत्रात म्हटले आहे की, 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्याने गरीब रुग्णांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. राष्ट्रपती राजवटीत शासनाचा कारभार सुरू ठेवण्याची जबाबदारी घटनेने आपल्यावर दिली आहे. आपल्या अनुमतीने हा कक्ष पुन्हा सुरू करून हजारो रुग्णांना दिलासा द्यावा' अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे. राज्यपाल महोदय या पत्राची दखल घेत हजारो गरीब रुग्णांना दिलासा देतील, अशी अपेक्षा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.
हेही वाचा... BREAKING.. राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली