मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता फेसबूक लाईव्ह द्वारे ( CM FB LIVE ) महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. ( CM Interact With People Facebook Live ) ( Chief Minister Uddhav Thackeray LIVE )
मुख्यमंत्री 5 वाजता लाईव्ह - राज्यात सद्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेदरम्यान उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येत आहे. अशात आता प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत 46 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता फेसबूक लाईव्ह द्वारे ( CM FB LIVE ) महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार आहेत.
हेही वाचा - ३४ आमदारांच्या पत्रासह अधिकृत गटनेतेपदावर शिंदे यांचा दावा