ETV Bharat / city

CM Visit To Delhi: मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीची चर्चा जोरात! मात्र, दौरा केलाचं नसल्याचा सरकारकडून दावा

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री सर्वांना हुलकावणी  देत दिल्लीला दाखल झाले. ( CM Visit To Delhi ) भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून गुरुवारी (29)रोजी पहाटे मुंबईला परतल्याची चर्चा सर्व ठिकाणी होत आहे. परंतु, याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले असून ही अफवा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

author img

By

Published : Jul 29, 2022, 3:11 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई - गेल्या ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची व देवेंद्र फडवणीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता महिना झाला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री शिंदे यांनी पाचवेळा दिल्लीवारी केली आहे. ( Chief Minister Eknath Shinde visit to Delhi ) तरीही मंत्रिमंडळाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल होणार आशा बातम्या दिवसभर सुरू होत्या. परंतु, एनवेळी त्यांनी तो दौरा रद्द केल्याचे सांगितले. तरीही बुधवारी रात्री सर्वाना हुलकावणी देत मुख्यमंत्री दिल्लीला गेले व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ते गुरुवारी पहाटे मुंबईत परतले अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याप्रसंगी विमानतळावर मोजक्या अधिकाऱ्यांशिवाय कोणीही नव्हते असेही सांगितले जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच त्यांची ही दिल्लीवारी झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर ४ वेळा केली आहे दिल्लीवारी! - परंतु या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी मी बुधवारी रात्री दिल्लीला गेलो नाही. या सर्व अफवा आहेत, असे सांगितले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी झाली नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी या अगोदर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा ८ जुलैला ते दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत दिल्लीत गेले होते. त्यानंतर १९ जुलैला शिवसेना खासदारांच्या भेटी घेण्यासाठी ते दिल्लीमध्ये दाखल झाले होते. यादरम्यान त्यांनी शिवसेनेच्या १२ बंडखोर खासदारांशी भेट घेतली.

मंत्रिमंडळ विस्तार केव्हा करायचा? - त्यानंतर पुन्हा २२ जुलै रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समारोपार्थ आयोजित भोजन कार्यक्रमात सामील होण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. त्यानंतर २४ जुलै रोजी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या शपथविधी समारंभास मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. व आता २७ जुलै रोजी ते दिल्लीत गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या दरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मंत्रिमंडळात किती सदस्य असावेत, मंत्रिमंडळ विस्तार केव्हा करायचा? यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु, आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः या गोष्टीला नकार दिला असल्याकारणाने या चर्चा जरी बंद झाल्या असल्या तरीही जोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या चर्चा पुन्हा रंगणार आहेत.

हेही वाचा - विधान परिषदेतील ठाकरेंच्या जागेसाठी रस्सीखेच; शिवसेना आणि शिंदे गटाकडून दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.