मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे Chief Minister Eknath Shinde meet Raj Thackeray यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवास स्थानी जात मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. यावेळी गणरायाचं दर्शन आणि राजसाहेबांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी ही भेट झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या भेटी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र अनेक जुन्या आठवणींना उजाळा या भेटीमुळे मिळाला असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी Shinde meet Raj Thackeray at Shivartirth Mumbai सांगितले.
केवळ सदिच्छा भेट यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "गणपती आले आहेत. त्यामुळे आनंदाचे वातावरण सगळीकडे आपण पाहतोय. त्यामुळे आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या घरी येऊन गणपतीचे दर्शन घेतले आहे. बाकी काहीच नाही. मी सदिच्छा भेट घेतली. काही दिवसांपूर्वी त्यांचे ऑपरेशन झालं होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस आणि गणपती दर्शन या दोन कारणांसाठी ही भेट घेतली. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यामुळे ही नव्या समिकरणांची नांदीदेखील ठरत नाही. ही केवळ सदिच्छा भेट होती. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
जुन्या आठवणींना उजाळा पुढं बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "खरंतर जेव्हा राज ठाकरे यांचं ऑपरेशन झालं त्याच वेळी मी त्यांच्या भेटीसाठी येणार होतो. पण, तेव्हा काही शक्य झाले नाही. आता गणपतीच्या निमित्ताने हा योग जुळून आला. त्यांचा देखील मला वाटत विसर्जन निघाला आहे. या भेटीत विशेष काही नाही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आम्ही सगळेजण बाळासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सानिध्यामध्ये काम केलेले आहोत. त्यावेळेस आमच्यासोबत राज ठाकरे यांनी देखील बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये काम केले, Eknath Shinde meet Raj Thackeray at Shivartirth असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा Dussehra Gathering: दसरा मेळावा कुणाचा? शिंदे गाटाचा, ठाकरे गटाचा की राज'गर्जना होणार; वाचा सविस्तर