मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ( Chief Minister Eknath Shinde ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) उद्या दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दिल्ली दौर्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोबत चर्चा होणार असल्याचे ही माहिती समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Union Home Minister Amit Shah ) भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस यांच्याकडून घेतली जाईल. मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत खुद्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रसारमाध्यमांना वेळोवेळी दिले आहेत. त्यानुसार या दिल्ली दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार बाबत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्याता आहे.
हेही वाचा - Ambadas Danve : 'मला शिंदे गटाकडून ऑपर, मात्र मी...'; अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,( Prime Minister Narendra Modi) गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची भेट घेतली होती. या या भेटीतही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली असून उद्या होणाऱ्या दौरा मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 20 दिवस उलटले तरी, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विरोधकांकडून सातत्याने नव्या सरकारवर टीका होत आहे.
हेही वाचा - Maharashtra Breaking News : आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा