ETV Bharat / city

CM Eknath Shinde : जिथे जातो तेथे मंत्रालय भरते; मुख्यमंत्र्यांकडून जोरदार फटकेबाजी - शिंदेंची मुंबईत जोरदार फटकेबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी रविंद्र नाट्यमंदिर येथील मेळाव्यात टीकाकारांवर जोरदार फटकेबाजी केली. जिथे जातो तिथे मंत्रालय भरते. माझे काम कुठेच अडून राहिलेले नाही, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचे खच्चीकरण होत असल्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde
author img

By

Published : Jul 15, 2022, 10:16 PM IST

मुंबई - शिंदे सरकार आल्यापासून मंत्रालयातून काम सुरू झाली नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविंद्र नाट्यमंदिर येथील मेळाव्यात टीकाकारांवर जोरदार फटकेबाजी केली. जिथे जातो तिथे मंत्रालय भरते. माझे काम कुठेच अडून राहिलेले नाही, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचे खच्चीकरण होत असल्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी ( Chief Minister Eknath Shinde ) पुनरुच्चार केला. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार येऊन पंधरा दिवसाहून अधिकचा काळ उलटून गेला आहे. मात्र मंत्रालयातून कामकाज सुरू झालेले नाही, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यावरून टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. मी मंत्रालयात नसलो तरी, माझं मोबाईलवर काम सुरू आहे. गाडीमध्येदेखील माझे काम सुरू आहे. काही लोक कागद गेऊन येतात त्यावर मी सह्या करून तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश देतो. मुख्यमंत्री असल्याने अधिकाऱ्यांना माझे शब्द पाळावे लागतात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्यात सरकार सत्तेवर असतानाही शिवसेनेच्या नेत्यांची कामे होत नव्हती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांना वारंवार भेटलो. आमदारांचे म्हणणे आणि तक्रारी मांडल्या. मात्र त्यांनी ऐकले नाही. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना पक्ष चार नंबरला गेला. खोट्या केसेसला काही कार्यकर्त्यांना सरकारमध्ये असूनही सामोरे जावे लागले. त्यामुळे नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागला. या निर्णयाला पन्नास आमदारांनी पाठिंबा दिला. या सर्वांचे मी आभार मानतो त्याने माझ्यावरती विश्वास टाकला. या सर्वांच्या राजकीय कारकीर्द भविष्यात अबाधित ठेवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भावना व्यक्त केल्याचे शिंदे म्हणाले. राज्यात भाजपच्या सोबतीने स्थिर सरकार आहे. कुणीही हे सरकार पाडणार नाही. कुणी तसा प्रयत्नही करू नका. तसे प्रयत्न कोणी करणार असेल तर एकनाथ शिंदे सुद्धा खूप काही नवीन नवीन आहे. आमचे ५० आमदार खूप कलाकार आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यातील निडरपणा सर्वांनी अवलंबला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना ते बास आहेत, असा सूचक इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

जेव्हा सरकार अल्पमतात असते तेव्हा कोणतीही कॅबिनेट घेता येत नाही. शेवटच्या कॅबिनेटमध्ये २०० निर्णय घेतले आहेत. हे निर्णय बेकायदेशीर आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. उद्या आम्ही कॅबिनेट घेऊन आम्ही हे निर्णय रद्द करणार आहे, कारण या निर्णयाला उद्या कोणी चॅलेंज करु शकतो. त्यामुळे हे निर्णय बेकायदेशीर ठरू शकले असते. आम्ही संभाजीनगर या नावाला स्टे दिलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून निघालेल्या शब्दाला आम्ही स्टे दिलेला नाही. तुम्ही कितीही खोट बोला ते पटणार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा -Vinayak Raut Criticized Eknath Shinde : फडणवीसांनी आज माइक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील; विनायक राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.