ETV Bharat / city

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर; केसरकर हेच मुख्य प्रवक्तेपदी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आले. ( New Appointments of Shiv Sena ) डॉ. बलाजी किणीकर यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर

author img

By

Published : Jul 27, 2022, 9:27 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आले. ( New Appointments of Shiv Sena ) डॉ. बलाजी किणीकर यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

दिपक केसरकर हेच पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी - शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची शिंदे यांनी सचिव पदावर नियुक्ती केली आहे. तर आधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आमदार दिपक केसरकर हेच पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती कायम राहणार आहेत असही स्पष्ट करण्यात आले आहे.

शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी - शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, किरण पावसकर आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. तर, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हा निर्णय फायदेशीर ठरणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे किरण पावसकर आणि संजय मोरे याना देण्यात आली. तर, बाकी शिलेदराना देखील ती लवकरच देण्यात येतील. या नियुक्त्यामुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार असून, पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचा - Prithviraj Chavan : 'शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवून हिंदुत्ववादी मतं...'; पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.