मुंबई मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ) द्वारे मेट्रो- ३ मार्गिकेवर पाच स्थानकांचे नाम अधिकार विविध नामांकित कंपन्यांना देण्यात आले असून त्याद्वारे कॉर्पोरेशनला वार्षिक ४० कोटी रुपयांचा महसूल नॉन- फेअर बॉक्स महसूल (Non Fare Box Revenue) मार्फत प्राप्त होणार आहे. मेट्रो-३ कार्यान्वित झाल्यानंतर पुढील ५ वर्षांमध्ये ५% वाढीसह सदर नाम अधिकाराद्वारे एकत्रितपणे २१६ कोटींचे उत्पन्न कॉर्पोरेशनला मिळणार आहे. म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मनीस मेट्रो रेल्वे स्थानकाचे नाव कोटक महिंद्रा बँक मेट्रो सीएएसएमटी होणार आहे. तसेच बांद्रा कुर्ला संकुल मेट्रो रेल्वे स्थानकापुढे कोटक महिंद्रा बँकेचे नाव लागणार आहे.
संबंधित स्थानकाच्या नाव आधी जोडले जाणार मेट्रो रेल्वे महामंडळ संचालिका अश्विनी भिडे यांनी याबाबत सांगितले की, नाव अधिकार अंतर्गत कोटक महिंद्रा बँकेकडे वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) स्थानक व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाचे अधिकार तर आयसीआयसीआय लोम्बार्डकडे सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाचे अधिकार देण्यात आले आहे. तसेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) कडे चर्चगेट आणि हुतात्मा चौक मेट्रो स्थानकांचे नाम अधिकार देण्यात आले आहेत. या अंतर्गत सदर कंपन्यांना ब्रँडिंगसाठी जागा मिळेल. तसेच ट्रेनच्या घोषणांमध्ये आणि स्थानकांच्या नकाशांमध्ये या कंपन्यांच्या नावाचा उल्लेख केला जाईल. सोबतच या कंपन्यांचे नाव संबंधित स्थानकाच्या नाव आधी जोडले जाणार आहे. या संदर्भात त्यांनी प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.
वार्षिक सरासरी उत्पन्न मेट्रो रेल्वे सस्थनांकाच्या नावासाठी कोटक महिंद्रा बँक, एलआयसी आणि आयसीआयसीसारख्या नामांकित कंपन्यांशी जोडले जाणे ही आनंदाची बाब आहे. एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे याबाबत म्हणाल्या की, नॉन फेअर बॉक्स महसूल निर्माण करण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ज्यामुळे निधी सुलभ होईल, आणि तिकीटाचे शुल्क वाजवी ठेवणे शक्य होईल. मेट्रो-३ स्थानकांद्वारे दरवर्षी प्रति स्थानक सरासरी रु. ८ कोटी ( १.१ मिलियन डॉलर ) महसूल प्राप्त होणार असून ही किंमत आजपर्यंत भारतील सर्वाधिक व जगातील सर्वाधिक उत्पन्न प्राप्त करणाऱ्या मेट्रो स्थानकांपैकी एक आहे. दुबई, माद्रिद, जकार्ता, क्वालालंपूर या मेट्रोचें प्रति स्थानक वार्षिक सरासरी उत्पन्न १ मिलियन डॉलर पर्यंत आहे, असेही भिडे म्हणाले आहेत.
ऑक्टस अॅडव्हायझर्स स्टुडिओ POD कन्सोर्टियम हे या प्रक्रियेसाठी सल्लागार म्हणून काम बघत होते. उर्वरित स्थानकांचे नाम अधिकार निविदा मेट्रो- ३ कार्यान्वित होण्याआधी ( ROD ) आधी आमंत्रित करण्याचे नियोजित आहे.