ETV Bharat / city

Shivaji Park Dadar : दादरचे छत्रपती शिवाजी महाराज पार्क होणार धूळमुक्त

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये काँक्रीटचा रस्ता बनवण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक व राजकीय पक्षांकडून केला जात होता. पण तसे नसून मैदानात कोणत्याही प्रकारचा काँक्रीटचा रस्ता बनवला जात नाही, पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी ग्रावेल्स ( Gravels in Shivaji Park ) टाकण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.

author img

By

Published : Feb 26, 2022, 9:12 AM IST

दादरचे छत्रपती शिवाजी महाराज पार्क होणार धूळमुक्त
Shivaji Park Dadar

मुंबई - दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात काँक्रीटचा रस्ता बनवण्यात येत असल्याचा आरोप केला जात होता. मात्र, गवताच्या आच्छादनाचे काम सुरू असल्याचे महापौरांनी ( Gravels in Shivaji Park ) सांगितले होते. मुंबई महापालिकेकडून या मैदानाची जमीन समतोल करणे, पाणी फवारणे आणि गवताच्या आच्छादनाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच हे मैदान धूळमुक्त होणार असल्याचे सांगण्यात आले.

मैदान धूळमुक्त होणार -

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान ऐतिहासिक मैदान आहे. येथे क्रिकेटसह विविध खेळ खेळले जातात. त्यामुळे हे मैदान खेळांचे मैदान म्हणून वापरले जाते. आजूबाजूला वसाहती असल्याने वाऱ्यामुळे मैदानातील माती त्यांच्या घरात जात होती. या धूळीच्या प्रदूषणामुळे रहिवाशांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. स्थानिकांच्या याबाबत तक्रारीही होत्या. याकडे लक्ष वेधून मुंबई महापालिकेकडून हे मैदान धूळ मूक्त करण्यासाठी वर्षा जलसंचयन प्रकल्प राबवला जात आहे. त्यानुसार, मैदानाखाली 36 रिंग व्हेल्स खोदण्यात आल्या आहेत. त्यातून दररोज साडेतीन लाख लीटर पाणी मैदानातील धुळीवर फवारले जात आहे. तसेच हे पाणी गवताच्या आच्छादनासाठीही वापरले जात आहे. आतापर्यंत मैदानात जमीन समतल करून गवताच्या आच्छादनाचे काम हे 90 टक्के पूर्ण झाले आहे. लवकरच हे मैदान पूर्णपणे धूळमुक्त होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मैदानात फक्त मातीचा ट्रॅक -

मैदानात खडी टाकल्याने खेळाडूना खेळण्यासाठी अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. मैदानाच्या मधोमध पाणी मुरण्यासाठी, ते पाणी रिंग व्हेल्समध्ये जाण्यासाठी चर खणून खडी भरण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे इथे डांबरी रस्ता बनवला जात असल्याचा गैरसमज स्थानिकांमध्ये झाला होता. मात्र, पाणी जमिनीत मुरण्यासाठी हा खडी आणि त्यावर मातीचा ट्रॅक तयार करण्यात येत आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट करण्यात आल्यानंतर स्थानिकांचा गैरसमज दूर झाला आहे.

हेही वाचा - Russia Ukraine Crisis : UNSC मध्ये भारत आणि चीनची तटस्थ भूमिका, मतदानापासून अलिप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.