मुंबई - चंद्रकांत पाटील यांची शिंदे भाजप सरकारमध्ये वर्णी लागली आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते. त्या स्पर्धेत चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांची नावे आघाडीवर होती. मात्र, आज अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी Chandrashekhar Bawankule is new Maharashtra BJP chief तर, आशिष शेलार यांची मुंबई अध्यक्षपदी Ashish Shelar to head Mumbai BJP निवड करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्रकही जारी करण्यात आलं आहे. बावनकुळे हे ओबीसी नेते आहेत. तर, शेलार हे मराठा समाजातून येतात. त्यामुळे भाजपने मराठा आणि ओबीसी नेत्यांना महत्वाचे पद देत जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे.
ओबीसी चेहरा, पक्षाला फायदा माजी ऊर्जामंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते पक्षाशी एकनिष्ठ तर आहेतच, पण विदर्भात त्यांच्या कामाचा ठसा आहे. शिवाय त्यांच्या रुपाने भाजपाला प्रदेश अध्यक्ष मिळाल्यामुळे ओबीसी समाजामध्ये देखील वेगळी भावना निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बावनकुळे सक्रीय झाले असून, विरोधकांचे मुद्देही ते खोडून काढत आहेत.
नितीन गडकरी यांच्याशीही जवळीक चंद्रशेखर बावनकुळे यांचे केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याशी जवळचे संबंध आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे नितीन गडकरी यांच्या मर्जीतले मानले जातात. केंद्रीय पातळीवरुन नेतेही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत विचारधीन होते. शिवाय आगामी काळातील निवडणुका आणि त्याअनुषंगाने पक्ष संघटनेचे कौशल्य या बाबींचा विचार करून ओबीसी समाजाचे मोठे नेते आणि पक्ष संघटनेसाठी होणारा फायदा या दोन्ही बाजू महत्वाच्या ठरल्या. फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जवळकीचा फायदा ही त्यांना झाला आहे. पण बावनकुळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते मानले जातात. त्यामुळेच त्यांचे विधानपरिषदेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात आले होते. विधानपरिषदेसाठी अनेकजण इच्छूक असताना देखील बावनकुळे यांची वर्णी लागली होती. त्यामुळे फडणवीसांसी असलेली जवळीकता हा देखील महत्वाचा मुद्दा मानला जात आहे.
पक्षाशी एकनिष्ठ विदर्भात भाजप नेत्यांची मोठी फळी आहे, असे असताना देखील बावनकुळे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवाय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असाताना २०१४ ते २०१७ या काळात ते उर्जामंत्री देखील होते. त्या काळातील त्यांच्या कामामुळे सरकारी योजनांच्या अंमलबाजवणीला वेग आला होता. आता विधानपरिषेदवर ते आमदार असले तरी त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. मागे २०१९ विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतरही बावनकुळे एकनिष्ठच राहिले. तसेच, पक्षाने दिली ती जाबाबदारी घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. त्याचाच फायदा त्यांना याठिकाणी झाला आहे.
मुंबईतील मराठा आक्रमक चेहरा मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. 2017 साली मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे होती. त्या निवडणुकीत भाजपने 33 जागांवरुन 83 वर उडी घेतली. त्यामुळे आशिष शेलार यांची पुन्हा एकदा मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच, आशिष शेलार यांच्या रुपाने मराठी नेता, मराठा नेता मुंबई भाजपाचा चेहरा म्हणून उभा करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
हेही वाचा - Rahul Narvekar शिवसेना शिंदे गट कामकाज सल्लागार समिती वाद विधानसभा अध्यक्षांचे स्पष्टीकरण म्हणाले