ETV Bharat / city

Chandrakant Patil : कंत्राटी अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वीच करा; चंद्रकांत पाटलांचे आदेश

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर (कंत्राटी) कार्यरत अध्यापकांचे (contracted teachers) मानधन दिवाळी पूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले आहेत.

author img

By

Published : Oct 15, 2022, 5:26 PM IST

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर (कंत्राटी) कार्यरत अध्यापकांचे मानधन (contracted teachers salary) दिवाळी पूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले आहेत.

तासिका तत्वावर काम करणारे अध्यापक कायम करा: राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत हजारो अध्यापकांचे मानधन वेळेत देणे आवश्यक आहे. परंतू काही महाविद्यालय त्यांचे मानधन वेळेत देत नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन दिवाळीपूर्वी २१ ऑक्टोबर पर्यत त्यांचे थकीत मानधन देण्यात यावे तसेच याबाबत संबंधित उच्च व तंत्र शिक्षण विभागीय सह संचालक यांनी आढावा घेऊन अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी मिळेल याकडे लक्ष द्यावे, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

या निर्णयानंतर कंत्राटी अध्यापक काहीसे सुखावले असले तरी तासिका तत्वावर काम करणारे अध्यापक कायमस्वरूपी नियुक्ती करा, अशी मागणी अजुनही प्रलंबित आहे. याबाबत एस.एफ.आय विद्यार्थी संघटनेचे प्रवीण मांजलकर यांनी म्हटले की, कंत्राटी अध्यापक पूर्ण वेतन आणि सुरक्षित वेतनाशिवाय दर्जेदार शिक्षण कसे देतील. शासनाने याचा विचार करावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.