ETV Bharat / city

दसरा मेळाव्यासाठी मुंबईत गर्दी जमवण्याचे आव्हान, शिवसेना शिंदे गटाचे शक्तीप्रदर्शन दसऱ्याला रंगणार - मैदान कार्यकर्त्यांनी भरगच्च करण्याचे आव्हान

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने (Dussehra Melava 2022) शिवसेनेची शिवाजी पार्क तर शिंदे गटाची सभा बीकेसी मैदानात होणार आहे. अवघ्या दहा दिवसांवर दसरा आल्याने गर्दी जमवून मैदान भरगच्च करण्याचे आव्हान दोघांपुढे असेल (Challenge of crowd gathering for Dussehra rally). यंदा दसरा मेळाव्यात शिवसेनेतील दोन गटात जोरदार शक्ती प्रदर्शन होणार हे मात्र निश्चित.

दसरा मेळाव्यासाठी गर्दी
दसरा मेळाव्यासाठी गर्दी
author img

By

Published : Sep 24, 2022, 12:44 PM IST

Updated : Sep 24, 2022, 7:56 PM IST

मुंबई - शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा, या वादावर न्यायालयाने पडदा टाकला आहे. (Dussehra Melava 2022) दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेची शिवाजी पार्क तर शिंदे गटाची सभा बीकेसी मैदानात होणार आहे. अवघ्या दहा दिवसांवर दसरा आल्याने गर्दी जमवून मैदान भरगच्च करण्याचे टार्गेट आता दोघांपुढे असेल (Challenge of crowd gathering for Dussehra rally). यंदा शिवसेनेतील दोन गटात जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे.

मैदान कार्यकर्त्यांनी भरगच्च करण्याचे आव्हान - गेल्या महिन्याभरापासून शिवाजी पार्क कोणाचा हा रखडलेला पेपर मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास परवानगी देत सोडवला. महापालिकेने अधिकारांचा गैरवापर केला. तर शिंदे गटाच्या याचिकेवर ताशेरे ओढत न्यायालयाने खरडपट्टी काढली. शिवसेनेचा दसरा मेळावा यामुळे शिवाजी पार्कवर होईल. तर फुटीर शिंदे गटाने बीकेसी मैदानात आधीच परवानगी मिळवली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मैदान कार्यकर्त्यांनी भरगच्च करण्याचे आव्हान यावेळी दोन्ही गटाला असणार आहे.

शिवसेनेचीही यंदा गर्दी जमवण्यासाठी मोठी कसरत - शिवाजी पार्क मैदानाची क्षमता ८० हजार ते एक लाख इतकी आहे. तर बीकेसी मैदानाची क्षमता दोन लाख इतकी आहे. शिवाजी पार्कच्या तुलनेत गर्दी जमवण्यासाठी बीकेसी मैदानातील सभा शिंदे गटाला आव्हानात्मक ठरेल. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसेनेचीही यंदा गर्दी जमवण्यासाठी मोठी कसरत होत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या गटप्रमुखांचा नुकताच मेळावा झाला. गोरेगाव येथील नेक्सो मैदानात शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन केल्याचे संकेत देणारा मेळावा होता. आता शिवाजीपार्क मैदान गर्दीने भरण्यासाठी स्थानिक पदाधिकारी, विभागप्रमुख तसेच आमदारांकडे जबाबदारी असणार आहे. शिंदे गटानेही जोरदार तयारी केली आहे. गल्ली बोळातील मंडळाना आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करण्यासाठी दोन्हीकडून रस्सीखेच वाढली आहे.

Last Updated : Sep 24, 2022, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.