ETV Bharat / city

Central Railway : मध्य रेल्वेने भंगारातून कमावले ४४३. ३५ कोटी रुपये! - मध्य रेल्वे लेटेस्ट न्यूज

मध्य रेल्वे ( Central Railway ) नेहमीच नावीण्यपुर्ण उपक्रम राबवित असते. मध्य रेल्वेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात आपल्या विभागातील ४४३ कोटी ३५ लाख रुपयांचे भंगार विकले ( Central Railway scrap sales ) आहे. शुन्य भंगार मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेनेहे काम केले आहे. याशिवाय कोविड-१९ महामारी असूनही मध्य रेल्वेने २०२०-२१ या वर्षात ३५० कोटी रुपयांचे भंगार (स्क्रॅप) विक्रीचे लक्ष्य ओलांडले आहे आणि ३९१.४३ कोटी रुपयांचे स्क्रॅप विकले आहे, जे गेल्या १५ वर्षातील सर्वाधिक आहे. a profit from

Central Railway
मध्य रेल्वेने भंगारातून कमावले कोट्यवधी रूपये
author img

By

Published : Mar 1, 2022, 4:05 PM IST

मुंबई - मध्य रेल्वे नेहमीच नावीण्यपुर्ण उपक्रम राबवित असते. मध्य रेल्वेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात आपल्या विभागातील ४४३ कोटी ३५ लाख रुपयांचे भंगार विकले ( Central Railway scrap sales ) आहे. शुन्य भंगार मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेनेहे काम केले आहे. याशिवाय कोविड-१९ महामारी असूनही मध्य रेल्वेने २०२०-२१ या वर्षात ३५० कोटी रुपयांचे भंगार (स्क्रॅप) विक्रीचे लक्ष्य ओलांडले आहे आणि ३९१.४३ कोटी रुपयांचे स्क्रॅप विकले आहे, जे गेल्या १५ वर्षातील सर्वाधिक आहे.

Central Railway
मध्य रेल्वेने भंगारातून कमावले कोट्यवधी रूपये

३१.६५% ने वाढले उत्पन्न -

मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने "झिरो स्क्रॅप मिशन" ( Zero scrap mission ) सुरू केले आहे. कोविड-१९ महामारी असूनही मध्य रेल्वेने २०२०-२१ या वर्षात ३५० कोटी रुपयांचे स्क्रॅप विक्रीचे लक्ष्य ओलांडले आहे आणि ३९१ कोटी ४३ लाख रुपयांचे स्क्रॅप विकले आहे, जे गेल्या १५ वर्षातील सर्वाधिक आहे. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात फेब्रुवारी-२०२२ पर्यंत भंगारातून ४४३ कोटी ३५ लाख उत्पन्नाची नोंद केली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील उत्पन्नापेक्षा हे १०६ कोटी ५७ लाख अधिक आहे जे ३१.६५% ने वाढले आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीतील उत्पन्न ३३६ कोटी ७८ लाख इतके होते. या स्क्रॅप मटेरियलमध्ये स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे साहित्य, निरूपयोगी (भंगार) डबे, वॅगन आणि इंजीन (लोकोमोटिव्ह) इत्यादींचा समावेश आहे.

रेल्वे मिशन मोडमध्ये काम करेल -

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी म्हणाले की, भंगार विक्री केवळ महसूल निर्माण करण्यातच मदत करत नाही तर यामुळे परिसराची देखरेख चांगल्या प्रकारे होते. ते म्हणाले की, रेल्वेतील विविध ठिकाणी असलेले व निवडण्यात आलेले सर्व भंगार साहित्य विकण्यासाठी मध्य रेल्वे मिशन मोडमध्ये काम करेल. "झिरो स्क्रॅप मिशन" चा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या सर्व ५ विभाग आणि विविध डेपोंमध्ये भंगार विक्रीचा उपक्रम हाती घेतला जात आहे.

हेही वाचा - Visit 12 Jyotirlingas on Mahashivratri : महाशिवरात्री निमित्ताने करा 12 ज्योतिर्लिंगांंचे दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.