मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून देशभरात 'जन आशीर्वाद' यात्रा सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा १९ ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. राणे हे दादर येथील चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. मात्र या अगोदरच शिवसेनेने राणे यांना इशारा दिला आहे. आज राणे यांचे मुंबईत आगमन झाले आहे, त्यांच्या या जनआशीर्वाद यात्रेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी..
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दादादरमधील शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाला राणेंना भेट देऊ देणार नाही असे ट्विट त्यांनी बुधवारी केले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे समाधीस्थळ परिसरात लावण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुंबई विमानतळ येथून याठिकाणी येणार आहेत.
हेही वाचा - भाजपाची जन आशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण, संजय राऊत यांची टीका