ETV Bharat / city

Central Govt Relaxes Air Travel : नागरिकांना परदेशी प्रवासाचा मार्ग मोकळा; केंद्र सरकारने निर्बंध हटवले

author img

By

Published : Feb 10, 2022, 4:01 PM IST

कोरोना आटोक्यात येत असल्याने केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नियमावलीत शिथीलता (Central Govt Relaxes Air Travel ) केली आहे. तसेच आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test Results) करण्याची गरज भासणार नाही.

Air Travel
Air Travel

मुंबई - कोरोना आटोक्यात येत असल्याने केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नियमावलीत शिथीलता (Central Govt Relaxes Air Travel ) केली आहे. तसेच आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test Results) करण्याची गरज भासणार नाही. मात्र, लसीकरण अहवाल (Vaccination Report) बंधनकारक असेल. येत्या 14 फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू होईल, असे शासनाने नमूद केले आहे.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यात लॉक डाऊन लागू करण्यात आला. परदेशातील विमानांना ही बंदी घालण्यात आली. पहिली-दुसरी आणि तिसरी लाट असल्याने अनेक देशांनी हवाई वाहतूक नियम कडक केले. कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार येत्या 14 फेब्रुवारीपासून आता नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केले जाणार आहेत.

RT - PCR ची गरज नाही
जोखीम आणि इतर देशांसोबत महत्वाचे नियम काढून टाकले आहेत. शिवाय RTPCR चाचणी करण्याची गरज भासणार नाही. सात दिवसांचे होम क्वारंटाईन नियम रद्द केले असून 14 दिवस मात्र स्वतःचे निरीक्षण करावे लागणार आहे. केवळ दोन टक्के प्रवाशांची या दृच्छिक चाचणी केली जाईल, असे शासनाने नमूद केले आहे. मार्गदर्शक तत्वानुसार भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी हवाई सुविधा बंदरावर स्वयं घोषणा फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती आणि वास्तविक माहिती द्यावी लागणार आहे. मागील चौदा दिवसांच्या प्रवासाचा तपशील देखील यात समाविष्ट करावा लागेल. तसेच प्रवाशांचा प्रवास सुरु झाल्यापासून 72 तासाच्या आत आरटीपीसीआर चाचणी अहवाल किंवा लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागणार आहे. तसेच संबंधित एअरलाईन्स आणि एजन्सीना प्रवाशांच्या तिकडं काय करावे आणि काय करू नये, याची माहिती द्यावी, अशा सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहेत.
हेही वाचा - India Corona Update : गेल्या 24 तासांत 67 हजार नवे रुग्ण, तर मृत्यूसंख्येत वाढ कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.